IMPIMP

New Passport Rules | नवीन पासपोर्टसाठी अर्ज करणे झाले सोपे! घरी बसून करता येणार अर्ज

by sachinsitapure
New Passport Rules | new passport rules modi government passport verification via digilocker

सरकारसत्ता ऑनलाईन – New Passport Rules | परदेश वारी करायची झाल्यास प्रत्येकासाठी पासपोर्ट असणे अत्यंत गरजेचे हे. मागील काही वर्षामध्ये पासपोर्ट बनवून घेणाऱ्या लोकांमध्ये वाढ झाली आहे. यामुळे प्रत्यक्ष जाऊन पासपोर्ट बनवून घेणे ही वेळखाऊ प्रक्रिय होऊन बसली होती. पासपोर्ट बनवणाऱ्यांची वाढती संख्या आणि अपुऱ्या सोयी ही बाब लक्षात घेत आता नवीन पासपोर्टसाठी अर्ज करायचा असल्यास तो घरी बसून देखील करता येणार आहे. भारत सरकारतर्फे (Government of India) नवीन पासपोर्टला अर्ज (Passport Application) करण्य़ाच्या प्रक्रियेमध्ये महत्त्वपूर्ण बदल करण्यात आला आहे. (New Passport Rules)

Join Our SarkarsattaWhatsapp GroupTelegram GroupFacebook Page for every Update

नवीन पासपोर्ट करुन घेण्यासाठी अर्जदारांना आता घरी बसून देखील अर्ज करता येणार आहे. यासाठी डिजीलॉकर या ॲप्लिकेशनचा (DigiLocker Application) वापर करुन अवाश्यक डॉक्युमेंट अपलोड करुन पासपोर्टसाठी अर्ज (Passport Application In Digilocker) दाखल करता येणार आहे. DigiLocker या ॲप्लिकेशनचा वापर करुन, www.passportindia.gov.in या अधिकृत वेबसाइटवरून अर्ज करता येणार आहे. यासाठी अधिकृत वेबसाईटवर अर्जासाठी लागणाऱ्या कागदपत्रांच्या स्कॅन कॉपी अपलोड केल्यानंतर अर्जदार त्यांचे पासपोर्ट अर्ज ऑनलाइन सबमिट करता येणार आहे. पण या प्रोसेसमध्ये डिजीलॉकर हे ॲप्लिकेशन महत्त्वाची भूमिका निभावणार आहे. अर्जदार जर अर्ज पडताळणीसाठी आधार क्रमांकाचा वापरत करत असल्यास त्यांना अर्ज सबमिट करण्यासाठी डिजीलॉकर खाते तयार करण्याचा सल्ला दिला जातो. यामुळे आता अर्जदारांना डिजीलॉकरचा वापर करत घरबसल्या नवीन पासपोर्ट अर्ज करता येणार आहे. (New Passport Rules)

नवीन पासपोर्ट अर्जदारांसाठी ही उपलब्ध सुविधा वापरण्यासाठी विदेश मंत्रालयाकडून (Ministry of External Affairs)
काही सूचना जारी करण्यात आला आहे.
मंत्रालयाकडून सांगण्यात आले आहे की, अर्जदारांनी त्यांची कागदपत्रे अपलोड करण्यासाठी डिजिलॉकर वापरल्यास,
त्यांना अर्ज प्रक्रियेदरम्यान (Passport Application) कोणत्याही कागदपत्रांच्या हार्ड कॉपी सोबत ठेवण्याची
आवश्यकता नाही. यामुळे एकूण प्रक्रियेचा वेळ कमी होण्यास मदत होईल, ज्यामुळे पासपोर्ट अर्ज प्रक्रियेची गुणवत्ता
वाढेल अशी अपेक्षा आहे. आता सर्व भारतीयांना या सुविधेमुळे पासपोर्ट काढणे ही सहज सोप्पे होणार आहे.

Related Posts