IMPIMP

Nitesh Rane | ‘नंदकिशोर चतुर्वेदीचा मनसुख हिरेन तर झाला नाही ना’ – नितेश राणे

by nagesh
Nitesh Rane | andheri by election bjp mla nitesh rane attacks shivsena uddhav thackeray

मुंबई : सरकारसत्ता ऑनलाइन Nitesh Rane | मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) यांचे मेहुणे श्रीधर पाटणकर (Shridhar Patankar) यांच्या ठाण्यातील नीलांबरी प्रकल्पातील 11 सदनिका सील करण्यात आल्या आहेत. ही कारवाई मंगळवारी सक्तवसुली संचालनालयाने (ED) केली आहे. या कारवाईनंतर राज्यातील राजकारणात मोठी खळबळ माजली. यानंतर सत्ताधारी महाविकास आघाडी (Maha Vikas Aghadi) आणि भाजप (BJP) यांच्यात राजकीय शीतयुद्ध पाहायला मिळत आहे. यातच भाजपचे आमदार नितेश राणे (Nitesh Rane) यांनीही प्रतिक्रिया व्यक्त केली आहे.

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

 

 

”नंदकिशोर चतुर्वेदीचा मनसुख हिरेन (Mansukh Hiren) तर झाला नाही ना? अशी शंका आमदार नितेश राणे (Nitesh Rane) यांनी व्यक्त केली आहे. नितेश राणे म्हणाले की, ”गेल्या वर्षभरापासून ट्विटच्या माध्यमातून नंदकिशोर चतुर्वेदी (Nandkishor Chaturvedi) यांच्याविषयी प्रश्न विचारत आहे. चतुर्वेदी नेमके कुठे गेले? त्यांना कोणी गायब केले? हे प्रश्न मी वारंवार विचारले आहेत. माझी ट्विटस त्यांच्या कुटुंबीयांपर्यंत पोहोचली असतील आणि मी काही खोटे बोलत असेल तर त्यांनी माझ्याविरुद्ध कारवाई करावी, असेही मी म्हटले होते. मात्र, त्यानंतरही नंदकिशोर चतुर्वेदी समोर आली नाही.”

 

पुढे नितेश राणे म्हणाले, ”आदित्य ठाकरे (Aditya Thackeray) आणि रश्मी ठाकरे (Rashmi Thackeray) यांचाही नंदकिशोर चतुर्वेदीशी संबंध आहे का?
अशी विचारणा करत, 2014 मध्ये आदित्य ठाकरे आणि रश्मी ठाकरे यांनी कोमो स्टॉक अँड प्रॉपर्टीज (Como Stock And Properties) नावाची कंपनी सुरु केली होती.
2019 पर्यंतची या कंपनीची कागदपत्रे उपलब्ध आहेत. त्यानंतर ही कंपनी नंदकिशोर चतुर्वेदी याच्याकडे गेली.
त्यामुळे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा मेहुणाच नव्हे तर पत्नी आणि मुलाचाही आर्थिक व्यवहारांशी संबंध आहे का? हे स्पष्ट झाले पाहिजे,” अशी मागणीच त्यांनी केली.

 

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

 

 

दरम्यान, ”ईडीने श्रीधर पाटणकर यांच्यावर आरोप नव्हे तर कारवाई केली आहे.
त्यामुळे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शांत राहून संशय आणखी वाढवू नये.
त्यांनी समोर येऊन स्पष्टीकरण द्यावे.
जेणेकरून नंदकिशोर चतुर्वेदी याचा मनसुख हिरेन अथवा जया जाधव तर झाला नाही ना, हे समजू शकेल,” असं ते म्हणाले.

 

Web Title :- Nitesh Rane | bjp leader and mla nitesh rane criticised cm uddhav thackeray over nandkishor chaturvedi and shridhar patankar case

 

हे देखील वाचा :

7th Pay Commission | केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी महत्वाची माहिती ! 31 मार्चपूर्वी पूर्ण करा ‘हे’ काम; 4500 रुपयांचा थेट लाभ, जाणून घ्या

Girish Bapat | पुरंदर, बारामती विमानतळाला विरोध नाही, पण पुण्यातील लोहगाव विमानतळ कुठेही हलवणार नाही – गिरीश बापट

CP Krishna Prakash | पोलीस आयुक्त कृष्ण प्रकाश यांची धडक कारवाई ! तक्रारीकडे दुर्लक्ष करणाऱ्या वरिष्ठ पोलीस निरीक्षक आणि हप्ता वसुल करणाऱ्या कर्मचाऱ्याची केली उचलबांगडी

 

Related Posts