IMPIMP

Nitin Gadkari | प्रत्येक ट्रकमध्ये ‘एसी’ बसवणे बंधनकारक; नितीन गडकरींची मोठी घोषणा

by nagesh
Nitin Gadkari | minister nitin gadkari big announcement about mandatory truck ac cabin in india

मुंबई : सरकारसत्ता ऑनलाईन –  Nitin Gadkari | देशातील प्रत्येक ट्रकमध्ये चालकाच्या केबिनमध्ये (Truck Driver’s Cabin) एसी (AC) बसवणे बंधनकारक करण्यात येणार आहे. 2025 पासून हा निर्णय लागू होणार आहे. याबाबतची मोठी घोषणा केंद्रीय रस्ते, वाहतूक व दळणवळण मंत्री नितीन गडकरी (Nitin Gadkari) यांनी यांनी केली. त्यामुळे देशातील ट्रक चालकांसाठी (Truck Driver) हा एक दिलासा आहे. गडकरींनी हा नियम लागू करण्याच्या प्रस्तावावर स्वाक्षरी केली आहे.

“आपल्या देशात काही चालक 12 ते 14 तास गाडी चालवतात. इतर देशांमध्ये बस आणि ट्रक चालकांच्या कामाचे तास निश्चित करण्यात आले आहेत. आपल्या देशात चालक 43 ते 47 अंश सेल्सियस तापमानात गाडी चालवतात. यावरून आपण आपल्याकडील चालकांच्या परिस्थितीचा अंदाज लावू शकतो, असे नितीन गडकरी (Nitin Gadkari) म्हणाले.

“मी जेव्हा मंत्री झालो तेव्हाच मी ट्रकमध्ये एसी केबिन सुरू करण्यास इच्छूक होतो.
मात्र, काही लोकांनी यामुळे खर्च वाढेल असे म्हणत याला विरोध केला.
मात्र, आज मी या निर्णयाच्या फाईलवर स्वाक्षरी केली आहे, असेही गडकरी म्हणाले.
या निर्णयानंतर भर उन्हात उष्णतेचा मारा सहन करत 12 ते 14 तास ट्रक चालवणाऱ्या ट्रक चालकांना दिलासा
मिळणार आहे. या निर्णयावर गेल्या अनेक दिवसांपासून चर्चा सुरू होती. गाडी चालवण्याची कठीण परिस्थिती
आणि रस्त्यांची अवस्था यामुळे तासंतास ट्रक चालवणारे चालक थकून जातात.
याच कारणाने अनेक अपघातही होतात. म्हणून हा निर्णय घेण्यात आल्याचे नितीन गडकरींनी सांगितले.

दरम्यान, वाहन उद्योगाला या नियमानुसार बदल करण्यासाठी 18 महिन्यांचा वेळ आवश्यक आहे.
रस्ते, वाहतूक मंत्रालयाने पहिल्यांदा 2016 मध्ये याबाबतचा प्रस्ताव आणला होता, अशी माहिती अधिकाऱ्यांनी दिली.

Web Title : Nitin Gadkari | minister nitin gadkari big announcement about mandatory truck ac cabin in india

Related Posts