IMPIMP

Nitin Gadkari Threat Case | नितीन गडकरी धमकी प्रकरणात तरुणी ताब्यात, नागपूर पोलीस कर्नाटकला रवाना

by nagesh
Nitin Gadkari Threat Case | young woman detained by the mangaluru police in the nitin gadkari threat case

नागपूर : सरकारसत्ता ऑनलाईन – केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या नागपूर कार्यालयात मंगळवारी (दि.21) धमकीचे (Nitin Gadkari Threat Case) फोन आले होते. धमकी देणाऱ्या व्यक्तीने 10 कोटी रुपये खंडणी (Extortion) मागितली होती. या घटनेमुळे खळबळ उडाली होती. घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन पोलिसांनी गडकरी यांच्या संपर्क कार्यालय आणि निवासस्थानाची सुरक्षा वाढवली (Nitin Gadkari Threat Case) आहे. पोलिसांनी धमकी देणाऱ्याचा शोध सुरु केला असताना या प्रकरणात मंगळुरु पोलिसांनी (Mangaluru Police) एका तरुणीला ताब्यात घेतले आहे.

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

नितीन गडकरी यांना धमकीचा फोन आल्यानंतर तपास यंत्रणांनी फोन करणाऱ्या व्यक्तीचा शोध सुरु केला. दरम्यान, या प्रकरणात (Nitin Gadkari Threat Case) आता एका तरुणीला मंगळुरु पोलिसांनी चौकशीसाठी ताब्यात घेतलं आहे. तर नागपूर पोलिसांचे एक पथक तात्काळ कर्नाटकला (Karnataka) रवाना झाले आहे. या प्रकरणात नागपूरातल्या धंतोली पोलीस ठाण्यात (Dhantoli Police Station) जीवे मारण्याची धमकी (Threats to Kill) तसेच खंडणीचा गुन्हा (FIR) दाखल करण्यात आला आहे.

 

काय आहे प्रकरण?

नितीन गडकरी यांच्या नागपूर येथील कार्यालयात जयेश पुजारी (Jayesh Pujari) या गुंडाच्या नावाने हा धमकीचा फोन आला असून 10 कोटींची खंडणी मागितली आहे. मंगळवारी सकाळी नितीन गडकरी यांच्या कार्यालयात धमकीचा फोन (Threatening Phone Call) आला. दोन वेळा फोन आला होता. फोन करणाऱ्या व्यक्तीने जयेश पुजारीच्या नावाने फोन केला. त्याने दहा कोटी रुपयांची खंडणी मागितली. एकापाठोपाठ एक धमकीचे फोन आल्याने कर्मचाऱ्यांनी तात्काळ याची माहिती पोलिसांना दिली.

 

दरम्यान, यापूर्वी देखील नितीन गडकरी यांना धमकीचे फोन आले होते.
जयेश पुजारी या नावानेच हे फोन आले होते.
या प्रकरणी पोलिसांनी बंगळुरला जाऊन चौकशी केली होती.
मात्र त्याने हे फोन केले नसल्याची माहिती देण्यात आली होती.
आता या प्रकरणी वरिष्ठ पोलीस अधिकारी तपास करत आहेत.

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

Web Title :  Nitin Gadkari Threat Case | young woman detained by the mangaluru police in the nitin gadkari threat case

 

हे देखील वाचा :

Gold-Silver Rate Today | पाडव्याच्या मुहूर्तावर सोन्या-चांदीच्या दरात घसरण, जाणून घ्या आजचा पुण्यातील भाव

Dada Bhuse On Autorickshaw Driver-Owner | ऑटोरिक्षा चालक-मालक यांच्या अडीअडचणी सोडविण्यासाठी लवकरच धोरण निश्चिती – मंत्री दादाजी भुसे

Vinod Tawde | महाराष्ट्राचे ‘भावी मुख्यमंत्री’ विनोद तावडे?, विनोद तावडे म्हणाले – ‘राज्याच्या राजकारणात मला… ‘

 

Related Posts