IMPIMP

No Water Cut In Pune On Thursday | आषाढी एकादशी आणि बकरी ईदनिमित्त पुण्यात गुरूवारी नियमित पाणीपुरवठा

by nagesh
No Water Cut In Pune On Thursday | Regular water supply in Pune on Thursday on the occasion of Ashadhi Ekadashi and Bakri Eid

पुणे : सरकारसत्ता ऑनलाईन – No Water Cut In Pune On Thursday | दर गुरूवारी बंद ठेवण्यात येणारा पाणीपुरवठा आषाढी एकादशी आणि बकरी ईदनिमित्त (गुरूवार दि. 29) सुरू ठेवण्याचा निर्णय पुणे महानगरपालिका प्रशासनाने (PMC Administration) घेतला आहे. मनपाच्या सर्वच जल केंद्रातून या दिवशी नियमितपणे पाणीपुरवठा केला जाणार आहे. याबाबतची माहिती पाणी पुरवठा विभागाचे (Pune PMC Water Supply Department) मुख्य अभियंता अनिरूध्द पावसकर (Aniruddha Pawaskar) यांनी दिली आहे. (No Water Cut In Pune On Thursday)

खडकवासला धरण (Khadakwasla Dam) साखळी प्रकल्पातील पाणीसाठा कमी झाल्याने पाणी बचतीसाठी आठवडयातील प्रत्येक गुरूवारी संपूर्ण शहराचा पाणीपुरवठा बंद ठेवण्याचा निर्णय यापुर्वी महापालिका प्रशासनाने घेतला होता. दि. 18 मे पासुन या निर्णयाची अंमलबजावणी देखील सुरू झाली. धरण साखळी क्षेत्रामध्ये पाणीसाठी कमी झाल्यामुळे मनपाने आठवडयाच्या दर गुरूवारी पाणी बंद ठेवण्याचा निर्णय घेतला होता.

Join Our SarkarsattaWhatsapp GroupTelegram GroupFacebook Page for every Update

आषाढी एकादशी आणि बकरी ईद लक्षात घेता दि. 29 जून 2023 रोजी म्हणजेच गुरूवारी पाणीपुरवठा बंद ठेवण्यात येऊ नये
अशी मागणी अनेक संस्था आणि संघटनांनी केली होती. त्यानुसार महापालिका प्रशासनाने
दि. 29 रोजी नियमित पाणीपुरवठा करण्याचा निर्णय घेतलेला आहे. (Pune PMC Water Supply)

Web Title : No Water Cut In Pune On Thursday | Regular water supply in Pune on Thursday on
the occasion of Ashadhi Ekadashi and Bakri Eid

Related Posts