IMPIMP

Omicron Restrictions Maharashtra | राज्यात पुन्हा निर्बंध ! ओमायक्रॉनचा धोका लक्षात घेऊन आज नवीन नियमावली जाहीर होणार

by nagesh
omicron-restrictions-maharashtra-omicron-restrictions-maharashtra-again-new-regulations-will-be-announced-today

मुंबई : सरकारसत्ता ऑनलाइन Omicron Restrictions Maharashtra | राज्यातल्या कोविड (Covid-19) रुग्ण संख्येत होणारी वाढ लक्षात घेता संसर्ग रोखण्यासाठी कशाप्रकारे निर्बंध लावता येतील यावर काल टास्क फोर्स (Maharashtra Covid Task Force)  सदस्यांची बैठक झाली. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) यांनी मार्गदर्शन केले. आगामी नाताळ, नववर्ष स्वागत असे प्रसंग लक्षात घेऊन कमीतकमी गर्दी कशी होईल तसेच विवाह समारंभ, पार्ट्या या अनुषंगाने हॉटेल्स आणि उपाहारगृहात होणाऱ्या गर्दीवर कसे निर्बंध लावता येतील यादृष्टीने विस्तृत चर्चा करण्यात येऊन याबाबत आज (दि. 24) नवी नियमावली जाहीर करण्याचे ठरले आहे. (Omicron Restrictions Maharashtra)

 

 

 

Join our Sarkarsatta WhatsApp Group Link , Telegram, Facebook Page for every update

 

 

 

दि. 23 डिसेंबर रोजी (काल) दूरदृश्य प्रणालीद्वारे झालेल्या बैठकीत इतर राज्यांनी लावलेल्या निर्बंधांवर (Omicron Restrictions Maharashtra) तसेच युरोप, अमेरिकेत कोरोनाची वाढत्या संख्येवर चर्चा करण्यात आली. मुख्य सचिव देवशीष चक्रवर्ती, मुख्यमंत्र्यांचे प्रधान सल्लागार सीताराम कुंटे, मुख्यमंत्र्यांचे अतिरिक्त मुख्य सचिव आशिष कुमार सिंह, मुख्यमंत्र्यांचे प्रधान सचिव विकास खारगे, मुख्यमंत्र्यांचे प्रधान सल्लागार डॉ दीपक म्हैसेकर, BMC आयुक्त इकबालसिंह चहल, वैद्यकीय शिक्षण सचिव सौरभ विजय, टास्क फोर्सचे डॉ संजय ओक, डॉ शशांक जोशी, डॉ अजित देसाई, डॉ राहुल पंडित आदींनी सहभाग घेतला व सूचना केल्या आहेत. आज (दि. 24) नवी नियमावली जाहीर होणार आहे.

 

हे देखील वाचा :

Pune Crime | ‘चाकण’च्या हद्दीत भर चौकात कुस्ती तालीम चालवणारे पैलवान नागेश कराळे यांची गोळ्या झाडून हत्या; पुण्यासह पिंपरी-चिंचवडमध्ये प्रचंड खळबळ

Varsha Gaikwad | दहावी, बारावीच्या विद्यार्थ्यांना फॉर्म भरण्यासाठी वाढवली मुदत, घेतला ‘हा’ मोठा निर्णय; शालेय शिक्षण मंत्र्यांची विधानपरिषदेत माहिती (व्हिडिओ)

Debit Card Fraud | डेबिट कार्ड फ्रॉडच्या नवीन पद्धती वापरताहेत सायबर गुन्हेगार, बचावासाठी ‘या’ सूचना जाणून घ्या

 

Related Posts