IMPIMP

Overconsumption Of Protein | प्रोटीनचे जास्त सेवन करू शकते नुकसान, जाणून घ्या याचे साईड इफेक्ट

by nagesh
Overconsumption Of Protein | overconsumption of protein may damage your kidney and many other problems know the side effects

सरकारसत्ता ऑनलाइन – Overconsumption Of Protein | प्रोटीन (Protein) हा जीवनाचा आधार आहे. प्रोटीन शरीराला आवश्यक ऊर्जा (Energy) पुरवतात. याशिवाय ऑक्सिजन (Oxygen) शरीरात एका ठिकाणाहून दुसर्‍या ठिकाणी पोहोचवते. हे शरीरातील तुटलेल्या पेशी आणि स्नायूंना (Cells And Muscles) दुरुस्त करते. (Overconsumption Of Protein).

 

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

 

 

प्रोटीन शरीरात अँटीबॉडीज (Antibody) तयार करतात, ज्यामुळे शरीर कोणत्याही रोगांशी (Diseases) लढण्यास सक्षम होते. अशा स्थितीत प्रोटीनशिवाय जीवनाची कल्पनाच करता येत नाही (Overconsumption Of Protein).

 

प्रत्येक गोष्टीचा मर्यादित वापर करायला हरकत नाही. कोणतीही वस्तू जास्त प्रमाणात घेतली (Overconsumption) तर त्याचा शरीरावर खूप वाईट परिणाम होतो. आजकाल लोक आहारात जास्त प्रोटीन घेऊ लागले आहेत. मांसाहार असो की पिझ्झा, बर्गर (Meat or Pizza, Burger) या पदार्थांमध्ये प्रोटीनचे प्रमाण खूप जास्त असते. याचे सेवन केल्याने शरीरातील प्रोटीनचे प्रमाण वाढते.

 

किती प्रोटीनची आवश्यकता (How Much Protein Is Needed) :
इंडियन कौन्सिल ऑफ मेडिकल रिसर्च (ICMR) नुसार, निरोगी व्यक्तीला दररोज 0.8 ग्रॅम ते 1 ग्रॅम प्रोटीन प्रति किलोग्रॅम वजन आवश्यक आहे. म्हणजेच, जर तुमचे वजन 80 किलो असेल, तर तुम्हाला दररोज 60 ते 70 ग्रॅम प्रथिने आवश्यक आहेत.

 

यापेक्षा जास्त प्रोटीन आरोग्यासाठी हानिकारक आहे. सर एचएन रिलायन्स फाउंडेशन हॉस्पिटल (Sir HN Reliance Foundation Hospital) च्या न्यूट्रिशनिस्ट आणि डायबेटिक्स विभागाचे प्रमुख डॉ. आयलीन कँडे (Dr. Eileen Canday) म्हणतात की, जर तुम्ही दीर्घकाळ आवश्यकतेपेक्षा जास्त प्रोटीन घेत असाल, तर शरीरातील चयापचयातील महत्तवाच्या अवयवांवर परिणाम होऊ शकतो. अशा स्थितीत ज्यांना आधीच समस्या आहेत त्यांना त्याचा अधिक फटका सहन करावा लागू शकतो.

 

 

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

 

जास्त प्रोटीनचे साईड इफेक्ट (Side Effects Of High Protein) :
डॉ. आयलीन यांच्या म्हणण्यानुसार, अतिप्रोटीनमुळे हृदयाशी संबंधित आजार, रक्तवाहिन्यांशी संबंधित समस्या,
लिव्हर आणि किडनीचे नुकसान आणि इतर अवयवांचे नुकसान होऊ शकते.
जे लोक टाइप 2 मधुमेहाचे रुग्ण आहेत. त्यांना याचा जास्त धोका असतो.

 

जे लोक जास्त प्रक्रिया केलेले मांस खातात, त्यांना भरपूर प्रोटीन मिळतात. अशा लोकांना कर्करोगाचा धोका सर्वाधिक असतो.
यासोबतच जे लोक जास्त प्रोटीन घेतात, त्यांना ऑस्टिओपोरोसिसचा धोका असतो.

 

वजन वाढणे (Weight Gain) :
जास्त प्रमाणात प्रोटीन खाल्ल्याने प्रथम शरीराच्या वजनावर परिणाम होतो.
शरीराचे वजन वाढल्यानंतर अनेक प्रकारच्या समस्यांना सामोरे जावे लागते हे तुम्हाला माहित आहेच.
जर शरीरात जास्त प्रोटीन झाले आणि त्यानुसार काम झाले नाही तर हे प्रोटीन शरीरात फॅट बनवायला लागते.

 

किडनी डॅमेज (Kidney Damage)
हाय प्रोटीन आहारामुळे, ज्यांना आधीच किडनीशी संबंधित आजार आहे त्यांना जास्त धोका असतो.
अतिरिक्त प्रोटीनमुळे, अमीनो अ‍ॅसिडमध्ये नायट्रोजनचे प्रमाण वाढते ज्यामुळे किडनी खराब होऊ शकते.

 

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

 

फक्त आणि फक्त आरोग्याच्या (हेल्थ) बातम्यांसाठी ज्वाईन करा आमचा स्पेशल टेलिग्राम ग्रुप, फक्त क्लिक करा

 

(Disclaimer : वरील लेखामध्ये सांगितलेले विधी, पध्दती आणि दाव्यांचं आम्ही कुठलंही समर्थन करत नाही. त्यांना केवळ सल्ला म्हणून घ्यावं.
अशा पध्दतीच्या कोणत्याही उपचार / औषध / आहारावर अंमल करण्यापुर्वी डॉक्टरांचा सल्ला घेणे आवश्यक आहे.)

 

Web Title :- Overconsumption Of Protein | overconsumption of protein may damage your kidney and many other problems know the side effects

 

हे देखील वाचा :

Prediabetes Symptoms | प्री-डायबिटीजच्या ‘या’ लक्षणांकडे करू नका दुर्लक्ष, बचाव करतील ‘हे’ 4 आयुर्वेदिक उपाय

Dementia | अँटीबायोटिक्स औषधांनी वाढला ‘या’ धोकादायक आजाराचा धोका! ताबडतोब व्हा सावध

Summer Tips | उन्हाळ्यात Tanning पासून बचाव करण्यासाठी करा ‘हे’ घरगुती उपाय

 

Related Posts