IMPIMP

PAN-Aadhaar Linking Penalty Rule | पॅन कार्ड आधारशी लिंक केलंय का ?; आजच करा ‘हे’ काम, अन्यथा बसेल 1000 रुपयांचा दंड

by nagesh
PAN- Aadhaar Link | pan aadhaar link how to check status of pan card and aadhaar card status know process

मुंबई : सरकारसत्ता ऑनलाइन PAN-Aadhaar Linking Penalty Rule | भारतीय नागरीकांचे आधार कार्ड (Aadhaar Card) हे एक महत्वाचे कागदपत्र आहे. खासगी आणि सरकारी कामासाठी आधार कार्ड हे उपयुक्त आहे. आधार कार्डबाबत सरकार वेळोवेळी सूचना करत असते. तसेच, पॅन कार्ड (PAN Card) आधार कार्डला लिंक करण्यासाठीही सूचना केल्या होत्या. दरम्यान अजुनही पॅन कार्ड (PAN Card) आधार कार्डला (AADHAAR) लिंक केलं नाही का ? हे काम केलं नसेल तर आजच करुन घेणे आवश्यक आहे. कारण लिंक करण्यासाठीचा आजचा अखेरचा दिवस आहे. आजच्या दिवसांत पॅन कार्ड आधार कार्डला लिंक केलं नाही तर दुप्पट दंड (PAN-Aadhaar Linking Penalty Rule) भरावा लागणार आहे.

 

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

 

 

पॅन कार्ड आधारशी लिंक करण्याची UIDAI ने दिलेली मुदत 31 मार्च होती. परंतु, त्यानंतर 500 रुपयांच्या दंडासह 30 जून 2022 पर्यंत वाढवण्यात आली होती. पण तरी देखील कोणी आधार आणि पॅन लिंक केलं नाही, तर मात्र त्यांना दुप्पट दंड भरावा लागणार आहे. दरम्यान, 1 जुलैपासून आधार आणि पॅन लिंक करण्यासाठी दुप्पट दंड आकारला जाणार आहे. त्याचबरोबर, सरकारने 31 मार्चनंतर 500 रुपयांची लेट फी लावली होती. आता उद्यापासून ही फी दुप्पट आकारली जाणार असल्याचं सांगण्यात आलंय. (PAN-Aadhaar Linking Penalty Rule)

 

असं करा लिंक –

incometaxindiaefiling.gov.in या लिंकवर क्लिक केल्यानंतर अगोदर तुमचा पॅन क्रमांक टाकावा लागेल.

त्यानंतर आधार नंबर लागेल आणि त्याखालीच आधार नंबरवर असलेलं नाव टाकावे लागेल.

वरील सर्व माहिती अचूक टाकल्यानंतर खाली दिलेला व्हेरिफिकेशन कोड टाकून ‘लिंक आधार’ या पर्यायावर क्लिक करावं लागेल.

यानंतर लगेच तुमचं आधार कार्ड पॅनशी लिंक होईल

 

पॅनकार्ड लिंक करण्यासाठी करा SMS –

तुम्हाला तुमच्या मोबाइल क्रमांकावरुन 567678 किंवा 56161 या क्रमांकावर मेसेज करायचा आहे. UIDPAN (स्पेस) तुमचा आधार नंबर (स्पेस) तुमचा पॅनकार्ड नंबर असा SMS या 567678 किंवा 56161 नंबरवर करा.

 

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

PAN-Aadhaar लिंक करण्यासाठी दंड भरण्याची प्रक्रिया –

https://onlineservices.tin.egov-nsdl.com/etaxnew/tdsnontds.jsp Protean वर क्लिक करा.

त्यानंतर Linking Request मध्ये CHALLAN NO./ITNS 280 वर क्लिक करा.

त्यानंतर Tax Applicable पर्याय निवडा.

तुम्हाला 30 जूनपर्यंत 500 रुपये दंड भरावा लागेल.

दंड भरण्याची पद्धत निवडा.

पुढे नेट बँकिंग प्रक्रिया (Net Banking Process) किंवा कार्ड मोड द्वारे पेमेंट करा.

पॅन क्रमांक आणि Assessment Year प्रविष्ट करा.

कॅप्चा प्रविष्ट करा.

तुम्ही Submit पर्यायावर क्लिक करताच पॅन आणि आधार लिंक होतील.

 

Web Title :- PAN-Aadhaar Linking Penalty Rule | pan aadhaar linking penalty rule changed from july 1 double penalty not linking pan with uidai aadhaar

हे देखील वाचा :

Pune Crime | पादचार्‍यांना लुटण्याच्या तयारी असलेल्या गुंडाचे टोळके गजाआड; पुणे स्टेशनवरुन येणार्‍यांना लुटण्याचा होता प्लॅन

Maharashtra Political Crisis | महाराष्ट्रात MVA सरकारचे कोसळणे 2024 च्या लोकसभा निवडणुकीपूर्वी भाजपासाठी वरदान, जाणून घ्या कसे ?

Pune Crime | 5 हजाराच्या मोबाईलसाठी अल्पवयीन मुलाचे दगडाने ठेचले डोके; आंबेगाव परिसरातील घटना

 

Related Posts