IMPIMP

Pradhan Mantri Suraksha Bima Yojana (PMSBY) | वर्षभरात बँक अकाऊंटमधून फक्त आणि फक्त 12 रूपये होतील ‘कट’ पण ‘इतक्या’ लाखांचा होईल लाभ; जाणून घ्या PMSBY बद्दल

by Team Deccan Express
pay just rs 12 per year for insurance cover of upto 2 lakh Pradhan Mantri Suraksha Bima Yojana (PMSBY)

मुंबई : सरकारसत्ता ऑनलाइन   Pradhan Mantri Suraksha Bima Yojana (PMSBY) | भविष्याचा विचार करता अनेक लोक आतापासूनच पैशाचा मेळ घालत असतात. त्याचबरोबर अनेक गुंतवणूकीचा (Investment) पर्याय शोधत असतात. सुरक्षित गुंतवणूक आणि योग्य परतावा याकडे अधिक लक्ष लागून असते. दरम्यान सरकारी विमा योजनेत (Government Insurance Scheme) गुंतवणूक करण्यासाठी एक चांगला पर्याय आहे. प्रधानमंत्री सुरक्षा विमा योजना PM Suraksha Bima Yojana (PMSBY) आहे.

 

प्रधानमंत्री सुरक्षा विमा योजनेची सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे यात तुम्हाला खूप कमी प्रीमियम भरावा लागणार आहे. ही योजना केंद्र सरकारकडून (Central Government) चालवली जातेय. परंतु, सर्वसामान्यांना या योजनेची फारशी माहिती नाही. अशा परिस्थितीमध्ये या योजनेतील काही महत्त्वाची माहिती असणे आवश्यक आहे. Pradhan Mantri Suraksha Bima Yojana (PMSBY)

 

‘या’ योजनेची वैशिष्ट्ये काय आहेत ?

अपघातामुळे मृत्यू झाल्यास संरक्षणासाठी विमा काढणे अत्यंत आवश्यक आहे. प्रधानमंत्री सुरक्षा विमा योजना ही एक अ‍ॅक्सिडेंटल पॉलिसी आहे. या योजनेचा लाभ घेण्यासाठी तुम्हाला १ वर्षात 12 रुपये गुंतवावे लागणार आहे. या विम्यात गुंतवणूक केल्यास, पॉलिसीधारकाला 2 लाखांपर्यंतचे विमा संरक्षण मिळते. अपघात झाल्यास, तुमच्या कुटुंबाला अथवा पॉलिसी नॉमिनीला 2 लाख रुपयांची मदत रक्कम मिळते. दुसरीकडे अपघातात विमाधारक अपंग झाल्यास, त्याला 1 लाख रुपयांची मदत रक्कम मिळेल.

 

या योजनेचा लाभ कोण घेऊ शकतात ?

– या योजनेचा लाभ घेण्यासाठी तुमचे वय 17 ते 70 वर्षांच्या दरम्यान असावे.
– तुमचे बँकेत बचत खाते असणे आवश्यक आहे.

या योजनेसाठी अर्ज कसा कराल ?
– प्रधानमंत्री सुरक्षा विमा योजनेचा लाभ घेण्यासाठी तुम्ही तुमच्या घराजवळील कोणत्याही बँकेच्या शाखेशी संपर्क साधावा.
– तेथे तुम्ही या योजनेची माहिती घेऊन अर्ज भरून सबमिट करा.

 

Web Title :- pay just rs 12 per year for insurance cover of upto 2 lakh Pradhan Mantri Suraksha Bima Yojana (PMSBY)

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

हे देखील वाचा :

Related Posts