IMPIMP

Pimpri Chinchwad Fire News | तळवडे परिसरातील फटाक्यांच्या गोदामाला भीषण आग, सहा महिलांचा होरपळून मृत्यू, 8 जण गंभीर

by sachinsitapure
Dehurod Police Station

पिंपरी : सरकारसत्ता ऑनलाईन –Pimpri Chinchwad Fire News | पिंपरी चिंचवड मधील तळवडे परिसरात असणाऱ्या एका स्पार्क कँडल (Spark Candles) बनवणाऱ्या कारखान्यात आग लागली. या आगीत 6 महिलांचा होरपळून मृत्यू (Death) झाला आहे. तर 8 जण गंभीर जखमी झाले आहेत. घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या (Fire Brigade) पाच गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या. अग्निशमन जवानांनी आगीवर नियंत्रण मिळवले आहे. फटका फॅक्टरी विनापरवाना सुरु होती, अशी माहिती मिळत आहे. या कंपनीत वाढदिवसाच्या कँडल बनवण्यात येत होते. ही घटना शुक्रवारी (दि.8) दुपारच्या सुमारास घडली. (Pimpri Chinchwad Fire News)

Join Our SarkarsattaWhatsapp GroupTelegram GroupFacebook Page for every Update

अग्निशमन दलाच्या जवानांनी आग आटोक्यात आणल्यानंतर कारखान्यात आणखी कोणी अडकले आहे का याचा शोध सुरु आहे. आतापर्यंत सहा महिलांचे मृतदेह बाहेर काढण्यात आले आहे. देहूरोड पोलीस ठाण्याच्या (Dehurod Police Station) हद्दीत हा कारखाना आहे. घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले आहेत. जखमी मध्ये सात महिला आणि एक पुरुष आहे. (Pimpri Chinchwad Fire News)

दुःखद घटना!

तळवडे येथील जोतिबा मंदिराजवळील कंपनीला भीषण आग लागली आहे. यामध्ये 15 महिला कामगार अडकल्याचे समजते. त्यामध्ये आठ ते दहा महिला मृत झाल्याची भिती व्यक्त होत आहे. प्रशासनाने घटनास्थळी पाच अग्निशमन बंब मदतकार्यासाठी रवाना केले आहेत. ही घटना अत्यंत दुर्दैवी आहे. मृत कामगारांच्या कुटुंबियांवर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. पिंपरी-चिंचवडच्या उद्योग क्षेत्रासाठी हा काळा दिवस म्हणावा लागेल. दुर्घटनेमध्ये मृत्युमूखी पडलेल्या कामगारांना भावपूर्ण श्रद्धांजली..!, अशी प्रतिक्रिया भाजप आमदार महेश लांडगे (BJP MLA Mahesh Landge) यांनी सोशल मीडियावरुन दिली आहे.

Related Posts