IMPIMP

Pune Crime News | मनसे पदाधिकाऱ्याकडे खंडणीची मागणी, दोन माहिती अधिकार कार्यकर्त्यांवर गुन्हा दाखल; धायरीतील प्रकार

by sachinsitapure
Extortion Case

पुणे : सरकारसत्ता ऑनलाईन – Pune Crime News | पुण्यातील महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या (Pune MNS) वाहतूक सेना अध्यक्ष व शिक्षण संस्था चालकाकडे 10 लाखांची खंडणी (Extortion) मागणी केली. तसेच हातपाय तोडून गेम करण्याची धमकी दिली. याप्रकरणी दोन माहिती अधिकार कार्यकर्त्यांवर (RTI Activist) सिंहगड रोड पोलीस ठाण्यात (Pune Police) गुन्हा दाखल केला आहे. हा प्रकार धायरी येथील बेनकर वस्ती येथे 4 जुलै 2023 ते 28 नोव्हेंबर 2023 या कालावधीत घडला आहे. (Pune Crime News)

Join Our SarkarsattaWhatsapp GroupTelegram GroupFacebook Page for every Update

याबाबत मनसे वाहतूक सेना शहराध्यक्ष शिवाजी वसंत मते Shivaji Vasant Mate (वय-47 रा. शिवालय अपार्टमेंट, समृद्धी अंगण सोसायटी धायरी गाव) यांनी सिंहगड रोड पोलीस ठाण्यात (Sinhagad Road Police Station) फिर्याद दिली आहे. यावरुन माहिती अधिकार कार्यकर्ते अक्षय रंगनाथ सावंत Akshay Ranganath Sawant (वय-29 रा. धायरेश्वर व्हिला, धायरी) व प्रदिप अंकुश दोडके Pradip Ankush Dodke (वय-35 रा. दांगट पाटील नगर, वडगाव बुद्रुक, पुणे) यांच्यावर आयपीसी 385, 385, 34 नुसार गुन्हा दाखल केला आहे. (Pune Crime News)

पोलीस उपनिरीक्षक श्रीकांत सावंत (PSI Shrikant Sawant) यांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी शिवाजी मते हे
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या पुणे वाहतूक सेनेचे अध्यक्ष आहेत. तसेच इशा इंटरनॅशनल प्री स्कूल
(Isha International Pre School) व गुरुकुल विद्यालय (Gurukul Vidyalaya) अध्यक्ष आहेत. तर आरोपी अक्षय सावंत आणि प्रदिप दोडके हे माहिती अधिकार कार्यकर्ते आहेत. आरोपींनी मते यांच्या इशा इंटरनॅशनल प्री स्कूल व गुरुकुल विद्यालयाच्या बांधकामाबाबत पुणे महापालिकेकडे (Pune Municipal Corporation (PMC) तसेच पुणे जिल्हा परिषदेच्या (Pune Zilla Parishad) माध्यमिक शिक्षण विभागाच्या अध्यक्षांकडे माहिती अधिकारामध्ये अर्ज दाखल केला होता. हा अर्ज मागे घेण्यासाठी आरोपींनी शिवाजी मते यांच्याकडे दहा लाख रुपयांची खंडणी मागितली. तडजोडी अंती तीन रुपयांची खंडणी आरोपींनी मागितली.

दरम्यान, यासंदर्भात शिवाजी मते यांनी खंडणी विरोधी पथकाकडे (Anti Extortion Cell) तक्रार केली होती.
त्यावेळी सावंत याने ‘तुला लय मस्ती आली आहे. तू माझ्याविरुद्ध खंडणी पथकाकडे तक्रार करतोस काय? तक्रार मागे घे.
नाहीतर तुझे हातपाय तोडून तुझा गेम करीन’ अशी धमकी दिली’ असे फिर्यादीत नमूद केले आहे.
पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक श्रीकांत सावंत करीत आहेत.

Related Posts