IMPIMP

Pimpri Corona | पिंपरी चिंचवडमध्ये गेल्या 24 तासात ‘कोरोना’च्या 54 रुग्णांचे निदान, जाणून घ्या इतर आकडेवारी

by nagesh
Pimpri Corona Update | Pimpri Chinchwad's journey towards Corona free city, find out other statistics

पिंपरी : सरकारसत्ता ऑनलाइन पिंपरी चिंचवड शहरामध्ये कोरोना बाधित (Pimpri Corona) रुग्णांची संख्या कमी होत आहे. मात्र कोरोनाच्या नव्या विषाणूचा संसर्ग झालेले रुग्ण आढळून आल्याने चिंता वाढली आहे. गेल्या 24 तासात पिंपरी चिंचवड शहरामध्ये कोरोनाचे (Pimpri Corona) 54 नवीन रुग्ण आढळून आले आहेत. दिलासादायक बाब म्हणजे गेल्या 24 तासात एकाही रुग्णाचा मृत्यू झाला नाही.

 

 

Join our Sarkarsatta WhatsApp Group Link , Telegram, Facebook page  for every update

 

 

 

आज दिवसभरात शहरातील विविध तपासणी केंद्रावर 7 हजार 670 संशयित लोकांची तपासणी करण्यात आली. यामध्ये 54 जणांचा अहवाल पॉझिटिव्ह
आला आहे. त्यामुळे शहरातील कोरोना बाधित रुग्णांची संख्या 2 लाख 77 हजार 879 इतकी झाली आहे. त्याचवेळी शहरामध्ये 63 रुग्ण कोरोनामुक्त
झाले असून त्यांना रुग्णालयातून घरी सोडण्यात आले आहे. आजपर्यंत 2 लाख 73 हजार 771 रुग्णांनी कोरोनावर (Recover patient) मात केली असून
त्यांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला आहे.

शहरामध्ये सध्या 326 अॅक्टिव्ह रुग्ण (Active patient) असून त्यांच्यावर शहरातील विविध रुग्णालयात उपचार सुरु आहेत. यामध्ये 193 संस्थात्मक
क्वारंटाईनमध्ये आहेत तर 133 होम क्वारंटाईनमध्ये आहेत. शहरामध्ये रुग्णसंख्या कमी होत असताना मृत्यूचे प्रमाण देखील कमी झाले आहे. आज
दिवसभरात एकाही रुग्णाचा मृत्यूची नोंद झालेली नाही. आजपर्यंत कोरोनामुळे शहरातील 4,513 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.

 

दिवसभरात 2,390 जणांचे लसीकरण
आज शहरामध्ये 69 ठिकाणी पिंपरी चिंचवड महापालिकेच्या वतीने लसीकरण (Vaccination) करण्यात आले आहे. तर 132 खासगी लसीकरण
केंद्रावर लसीकरण करण्यात आले. आज दिवसभरात 2 हजार 390 जणांना लस देण्यात आली आहे. आजपर्यंत शहारामध्ये 27 लाख 27 हजार 471
जणांना लस देण्यात आली आहे.

 

 

 

Join our Sarkarsatta WhatsApp Group Link , Telegram, Facebook page  for every update

 

 

Web Title :- Pimpri Corona | Diagnosis of 54 patients of ‘Corona’ in Pimpri Chinchwad in last 24 hours, find out other statistics

 

हे देखील वाचा :

Pune Crime | रिक्षा, दुचाकी चोरणारा सराईत गुन्हे शाखेकडून गजाआड; रिक्षासह 3 दुचाकी जप्त

Pune Crime | पुण्यातील स्वारगेट परिसरातील अट्टल गुन्हेगार एक वर्षासाठी स्थानबद्ध, MPDA कायद्यान्वये पोलीस आयुक्त अमिताभ गुप्तांची 48 जणांवर कारवाई

Pune News | थंडीत पुणेकरांचे मद्यप्रेम वाढले ! गतवर्षीपेक्षा यंदा मद्याची अधिक विक्री

 

Related Posts