IMPIMP

Pimpri Corona Update | पिंपरी चिंचवडमध्ये गेल्या 24 तासात ‘कोरोना’च्या 130 रुग्णांना डिस्चार्ज; जाणून घ्या इतर आकडेवारी

by nagesh
Pimpri Corona Update | Great relief One digit number of corona patients in Pimpri Chinchwad know other statistics

पिंपरी : सरकारसत्ता ऑनलाइनपिंपरी चिंचवड शहरामध्ये कोरोनाची (Pimpri Corona Update) लाट ओसरत आहे. गेल्या 24 तासात पिंपरी चिंचवड शहरामध्ये (Pimpri Corona Update) 77 नवीन रुग्ण आढळून आले आहेत. तर एकाही रुग्णाच्या मृत्यूची नोंद झाली नाही. त्यामुळे मोठा दिलासा मिळाला आहे. तसेच आज शहरात एकाही ओमायक्रॉनबाधित रुग्णाची नोंद झालेली नाही.

 

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

 

 

पिंपरी चिंचवड महापालिकेच्या वैद्यकीय विभागाने (PCMC Medical Department) दिलेल्या आकडेवारीनुसार, आज दुपारी चार वाजेपर्यंत 5 हजार 914 संशयितांची तपासणी करण्यात आली. यामध्ये 77 जणांचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. त्यामुळे शहरातील कोरोना बाधित (Pimpri Corona Update) रुग्णांची संख्या 3 लाख 58 हजार 632 इतकी झाली आहे. त्याचवेळी शहरामध्ये 130 रुग्ण कोरोनामुक्त झाले असून त्यांना रुग्णालयातून घरी सोडण्यात आले आहे. आजपर्यंत 3 लाख 54 हजार 223 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे.

 

शहरामध्ये सध्या 520 अ‍ॅक्टिव्ह रुग्ण आहेत. यामध्ये 57 रुग्ण संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत. तर 463 रुग्ण होम क्वारंटाईनमध्ये आहेत. शहरामध्ये रुग्णसंख्या कमी होत असताना मृत्यूचे प्रमाण देखील कमी होत आहे. आज दिवसभरात एकाही रुग्णाच्या मृत्यूची नोंद झालेली नाही. आजपर्यंत कोरोनामुळे शहरातील 4,620 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.

 

शनिवारी (दि.26) शहरामध्ये 69 ठिकाणी पिंपरी चिंचवड महापालिकेच्या वतीने लसीकरण (Vaccination) करण्यात आले आहे.
तर 147 खासगी लसीकरण केंद्रावर लसीकरण करण्यात आले.
आज दिवसभरात 4 हजार 156 जणांना लस देण्यात आली आहे.
आजपर्यंत शहारामध्ये 34 लाख 14 हजार 558 जणांना लस देण्यात आली आहे.

 

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

Web Title :- Pimpri Corona Update | 130 patients of Corona discharged in Pimpri Chinchwad in last 24 hours; Learn other statistics

 

हे देखील वाचा :

Shamita Shetty Viral Video | शमिता शेट्टीवर का आली अशी वेळ, सर्वांनी केलं दुर्लक्ष; पाहा व्हायरल व्हिडिओ

Amruta Fadnavis | राष्ट्रवादीच्या जिल्हाध्यक्षांकडून अमृता फडणवीसांचा केला आक्षेपार्ह उल्लेख

ST Worker Suicide | धक्कादायक ! 3 महिने पगार नसल्याने एसटी कर्मचाऱ्याने संपवलं जीवन

 

Related Posts