IMPIMP

PM Kisan योजनेचे 6000 रुपये मिळत नसतील तर करा ‘हे’ सोपे काम, मिळू लागतील पैसे! जाणून घ्या पूर्ण प्रोसेस

by nagesh
PM Kisan | pm kisan samman nidhi yojna 13th installment can come in the account of farmers this week

सरकारसत्ता ऑनलाइन – PM Kisan | पीएम किसान सन्मान निधी योजना (PM Kisan Samman Nidhi Yojana) ही पूर्णपणे केंद्र सरकारची योजना आहे, ज्याद्वारे पात्र शेतकरी कुटुंबांना दरवर्षी 6,000 रुपयांची आर्थिक मदत दिली जाते. हे पैसे प्रत्येकी दोन हजार रुपयांच्या तीन हप्त्यांमध्ये शेतकर्‍यांच्या खात्यावर पाठवले जातात. आत्तापर्यंत 10 हप्ते ट्रान्सफर केले गेले आहेत आणि आता 11 वा हप्ता (PM Kisan 11th Installment Date) येणार आहे. (PM Kisan)

 

 

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

 

 

PM Kisan योजनेसाठी कोण पात्र?
दोन हेक्टरपेक्षा कमी जमीन असलेली शेतकरी कुटुंबे पीएम किसान योजनेसाठी पात्र आहेत. सरकारच्या दृष्टीने कुटुंबाची व्याख्या म्हणजे पती, पत्नी आणि अल्पवयीन मुले. जर तुम्ही या कक्षेत येत असाल आणि तुम्हाला अद्याप या योजनेचा लाभ मिळत नसेल, तर तुम्हाला पीएम किसान योजनेचा लाभ घेण्यासाठी नोंदणी करावी लागेल. या यादीत नाव कसे नोंदवावे ते जाणून घेवूयात…

 

पीएम किसान लिस्टमध्ये असे टाका नाव

पीएम किसान सन्मान निधीच्या अधिकृत वेबसाइटला भेट द्या.

Pmkisan.gov.in ही अधिकृत वेबसाइट आहे.

इथे ‘माय कॉर्नर’वर जा.

‘नवीन शेतकरी नोंदणी’ वर क्लिक करा.

नोंदणी फॉर्म भरा.

सर्व आवश्यक तपशील योग्यरित्या भरा आणि ’सबमिट’ करा.

तुम्ही पात्र असाल तर तुमचे नाव यादीत समाविष्ट केले जाईल.

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

 

 

पीएम किसान योजनेचे स्टेटस असे तपासा?

pmkisan.gov.in या वेबसाइटवर, ’माय कॉर्नर’मधील स्टेटस निवडा.

त्यानंतर ’लाभार्थी स्टेटस’ पर्याय निवडा.

मागितलेले तपशील भरा. जसे- आधार क्रमांक, खाते क्रमांक किंवा मोबाइल क्रमांक.

कॅप्चा कोड प्रविष्ट करा आणि ’डेटा प्राप्त करा’ वर क्लिक करा.

आता तुमच्या स्क्रीनवर स्टेटस दिसेल.

* केवायसी अपडेट अनिवार्य आहे.

 

आता PM किसान योजनेसाठी केवायसी अपडेट (PM Kisan Yojana KYC) करणे आवश्यक झाले आहे. अशावेळी, तुम्हाला हे देखील माहित असले पाहिजे की योजनेसाठी केवायसी कसे अपडेट करावे. हे काम ऑनलाइन किंवा ऑफलाइन दोन्ही प्रकारे करता येते. ई-केवायसी कसे अपडेट करायचे ते जाणून घेवूयात…

 

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

 

पीएम किसान योजनेत ई-केवायसी कसे अपडेट करायचे?

Pmkisan.gov.in वेबसाइटवर eKYC पर्याय निवडा.

आधार क्रमांक आणि कॅप्चा कोड प्रविष्ट करा, नंतर सर्च वर क्लिक करा.

आधार कार्डशी लिंक केलेला मोबाईल नंबर टाका.

आता फक्त मोबाईलवर आलेला ओटीपी भरा आणि सबमिट करा.

 

 

Web Title :- PM Kisan | how to register for pm kisan yojana 11th installment date 2000 rupees to be transfered in farmers account

 

हे देखील वाचा :

Pune NCP | राष्ट्रपुरुषांचा सतत अवमान हे RSS आणि भाजपचे व्यापक कारस्थान, प्रशांत जगताप यांचा भाजपवर हल्लाबोल

Sambhaji Raje Chhatrapati | संभाजीराजेंचं उपोषण मागे, मागण्या मान्य झाल्याचं जाहीर (व्हिडिओ)

Pune Corona Update | पुणेकरांना मोठा दिलासा! ‘कोरोना’ची रुग्णसंख्या पन्नासच्या आत, गेल्या 24 तासात एकाही रुग्णाचा मृत्यू नाही, जाणून घ्या इतर आकडेवारी

 

Related Posts