IMPIMP

PM Narendra Modi | PM मोदींना काळे झेंडे दाखवणाऱ्या काँग्रेसच्या महिला नेत्याने स्वतःवरच का झाडली होती गोळी?, जाणून घ्या कारण

by nagesh
PM Narendra Modi | congress rita yadav showing black flag pm narendra modi shot herself sultanpur truth come

सुल्तानपूर : वृत्तसंस्था PM Narendra Modi | येथे पूर्वांचल एक्सप्रेसवेचं (Purvanchal Expressway) लोकार्पणप्रसंगी झालेल्या सभेत पंतप्रधान
नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांना काळे झेंडे दाखवणाऱ्या काँग्रेसच्या (Congress) महिला नेत्या रिता यादव (Rita Yadav) यांच्यावरील हल्ल्या
प्रकरणात पोलिसांनी धक्कादायक खुलासा केला आहे. पक्षात स्वतःचं महत्त्व व राजकीय वजन वाढवण्यासाठी रिता यादव यांनी स्वतः वरच गोळी झाडल्याचा (Firing) पोलिसांनी दावा केला आहे.

 

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

 

पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) 16 डिसेंबरला सुल्तानपूर (Sultanpur) येथे पूर्वांचल एक्सप्रेस वेचं लोकार्पण करण्यासाठी पोहचले होते. त्यानंतर झालेल्या सभेत रिता यादव (Rita Yadav) हिने काळे झेंडे दाखवत योगी मुर्दाबादच्या घोषणा दिल्या होत्या. पंतप्रधानांच्या कार्यक्रमात काळे झेंडे दाखवल्याने रिता यादव प्रसिद्धीच्या झोतात आल्या होत्या. त्यानंतर 3 जानेवारीला लखनऊ वाराणसी बायपास मार्गावर अज्ञात हल्लेखोरांनी तिच्यावर जीवघेणा हल्ला (Attack) केल्याचा आरोप केला. यामध्ये तिच्या पायाला गोळी लागली होती. जखमी अवस्थेत तिला रुग्णालयात दाखल केले होते. त्यानंतर तिने पोलिसात तक्रार दिली होती. या घटनेनंतर काँग्रेसने योगी सरकारवर (Yogi Government) निशाणा साधला होता. दरम्यान, ज्यावेळी पोलिसांनी या घटनेच्या तपासाला सुरुवात केली त्यावेळी काही संशयास्पद गोष्टी आढळून आल्या.

 

या हल्ल्याचे षड्यंत्र रिता यादवने सहकारी माधव यादवसोबत (Madhav Yadav) मिळून केल्याचं पोलीस तपासात समोर आलं आहे. उत्तर प्रदेशाच्या विधानसभा निवडणुकीची घोषणा झाली आहे. त्यासाठी काँग्रेसच तिकीट मिळावं म्हणून रिताने हा हल्ला करवून घेतला होता. तिने तिचा ड्रायव्हर मुस्तकीम (Mustakim), सूरज यादव (Suraj Yadav) आणि माधव यादव (Madhav Yadav) त्याच्यासह एका अज्ञात व्यक्तीशी हातमिळवणी करून स्वत:वर गोळी चालवली. हे सर्व लोक रिता यादवच्या गाडीत होते. हल्ला झाल्यानंतर त्यांनी तेथून पळ काढला होता. पोलिसांनी रिता यादवसह 3 लोकांना अटक (Arrested) केली असून हत्यारं जप्त करण्यात आली आहे. समाजवादी पार्टीत (Samajwadi Party) असताना सन्मानस्पद वागणूक मिळत नसल्याने रिता यादव हिने अमेठी येथे प्रियांका गांधी (Priyanka Gandhi) यांच्या उपस्थितीत काँग्रेसमध्ये प्रवेश केला होता.

 

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

Web Title :-  PM Narendra Modi | congress rita yadav showing black flag pm narendra modi shot herself sultanpur truth come

 

हे देखील वाचा :

UP Assembly Election 2022 | अयोध्येत CM योगींविरोधात शिवसेना निवडणुकीच्या मैदानात? संजय राऊत घेणार राकेत टिकैत यांची भेट

Pune Crime | खून करुन फरार झालेल्या आरोपीच्या बिबवेवाडी पोलिसांनी तासाभरात आवळल्या मुसक्या

Thackeray Government | ठाकरे सरकारचा मोठा निर्णय, वर्षभरासाठी सर्व स्कूल बसचा ‘वाहन कर’ माफ

 

Related Posts