IMPIMP

Policeman Dies In Accident | पिंपरी-चिचंवड पोलीस दलातील पोलीस कर्मचाऱ्याचा अपघाती मृत्यू

जगाचा निरोप घेतानाही कर्तव्य निभावलं केलं अवयव दान

by sachinsitapure
Policeman Dies In Accident | accidental death of policeman of pimpri chinchwad city force

पिंपरी : सरकारसत्ता ऑनलाईन – Policeman Dies In Accident | अपघातात गंभीर जखमी झालेल्या पिंपरी चिंचवड पोलीस दलातील (Pimpri Chinchwad Police) एका कर्मचाऱ्याचा उपचारादरम्यान सोमवारी (दि.14) मृत्यू (Policeman Dies In Accident) झाला. एमआयडीसी भोसरी पोलीस ठाण्याच्या (MIDC Bhosari Police Station) हद्दीत खंडेवस्ती, स्पाईन रोड येथे 2 ऑगस्ट रोजी हा अपघात झाला (Accidental Death) होता. घरफोडीच्या (Burglary) गुन्ह्यात मोठी कामगिरी केली होती. त्यांच्या कामगिरीचे वरिष्ठांनी कौतुक केले. पण या कामगिरीची माहिती जगासमोर येण्यापूर्वीच त्यांच्यावर काळाने घाला घातला.

Join Our SarkarsattaWhatsapp GroupTelegram GroupFacebook Page for every Update

राजेश नामदेव कौशल्य Rajesh Namdev Kaushalya (वय-38) असे मृत्यू झालेल्या पोलीस अंमलदाराचे (Policeman Dies In Accident) नाव आहे. त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुले आहेत. राजेश कौशल्य हे पिंपरी चिंचवड पोलिसांच्या गुन्हे शाखेच्या (Pimpri Crime Branch) दरोडा विरोधी पथकात (Anti-Robbery Squad) कार्यरत होते. ते 2009 साली महाराष्ट्र पोलीस दलात (Maharashtra Police) भरती झाले. सुरुवातीच्या काळात त्यांनी नांदेड येथे काम केले. त्यानंतर 2018 मध्ये त्यांची पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालयात बदली झाली. गेल्या दीड वर्षापासून दरोडा विरोधी पथकात कार्यरत होते.

2 ऑगस्टला झाला अपघात

राजेश कौशल्य हे 2 ऑगस्ट रोजी रात्री उशिरा दुचाकीवरुन घरी जात होते. अचानक कुत्रा आडवा आला. त्याला वाचवत असताना दुचाकीवरील नियंत्रण सुटल्याने अपघात झाला. त्यांनी हेल्मेट घातले होते. मात्र अपघातावेळी ते निघाले. त्यामुळे ते गंभीर जखमी झाले. रस्त्यावर वर्दळ नसल्याने सुरुवातीला त्यांना 15 ते 20 मिनिटे मदत मिळाली नाही. काही वेळाने तेथून जाणाऱ्या एका पीएमपी बस (PMP Bus) चालकाला हा प्रकार दिसला. त्याने तातडीने एमआयडीसी पोलिसांना माहिती दिली.

पुण्यात उपचारादरम्यान निधन

अपघाताची माहिती मिळताच एमआयडीसी भोसरी पोलीस ठाण्यातील पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली. त्यांना वायसीएम रुग्णालयात (YCM Hospital) उपचारासाठी भरती करण्यात आले. डोक्याला गंभीर दुखापत झाल्याने राजेश यांना पुण्यातील एका खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. त्यांच्यावर उपचार सुरू असताना सोमवारी त्यांची प्राणज्योत मालवली. त्यांच्या निधनाचे वृत्त समजताच पिंपरी चिंचवड शहर पोलीस दलात शोककळा पसरली.

मोठ्या कामगिरीचे वरिष्ठांकडून कौतुक पण…

घरफोडीच्या गुन्ह्यात राजेश कौशल्य यांना त्यांच्या खबऱ्याकडून माहिती मिळाली.
त्यानुसार दरोडा विरोधी पथकाने घरफोडीचे अनेक गुन्हे उघडकीस आणले.
त्यांच्या या कामगिरीबद्दल वरिष्ठांनी त्यांचे कौतुक केले.
या कामगिरीबाबत 2 ऑगस्ट रोजी रात्री उशिरापर्यंत कार्यालयात कायदेशीर कामकाज केले.
त्यानंतर ते दुचाकीवरुन घरी जात असताना अपघात झाला.

अवयव दान करण्याचा निर्णय

समाज सेवेची जाण असल्याने राजेश यांनी मृत्यूनंतर अवयव दान (Organ Donation) करण्याचा अर्ज भरला होता.
रुग्णालयात उपचार सुरु असताना रविवारी (दि.13) त्यांना ब्रेन डेड Brain Dead (मेंदुमृत) घोषीत करण्यात आले.
त्यानंतर सोमवारी सकाळी त्यांचे निधन झाले. त्यानंतर त्यांच्या घरच्यांनी देखील
अवयव दानासाठी संमती दिल्यानंतर राजेश कौशल्य यांचे अवयव दान करण्यात आले.

Web Title : Policeman Dies In Accident | accidental death of policeman of pimpri chinchwad city force

 

Related Posts