IMPIMP

Pune Crime News | कर्नलचे पिस्तुल आणि जिवंत काडतुस चोरट्यांनी लांबविले

by sachinsitapure
Pune Crime News | The colonel's pistol and live cartridges were stolen by the thieves

पुणे : सरकारसत्ता ऑनलाईन – Pune Crime News | खडकी येथील आर्मीच्या बेस वर्कशॉपमधून (Army Base Workshop Khadki) एका कर्नलचे (Colonel) पिस्तुल (Pistol) आणि तब्बल २० जिवंत काडतुसे चोरट्याने चोरुन नेल्याचा प्रकार समोर आला आहे. (Pune Crime News)

Join Our SarkarsattaWhatsapp GroupTelegram GroupFacebook Page for every Update

याबाबत कर्नल समीर गर्ग (वय ५८,रा. आर्मड कोर्प सेंटर अँड र्स्कुल अहमदनगर) यांनी खडकी पोलिसांकडे (Khadki Police Station) फिर्याद (गु. रजि. नं. २९३/२३) दिली आहे. (Pune Crime News)

 

याबाबत पोलिसांनी सांगितले की, समीर गर्ग हे कर्नल असून त्यांची पूर्वी आर्मी बेस वर्कशॉपमध्ये नियुक्ती होती.
त्यावेळी त्यांना येथे एक खोली देण्यात आली होती. त्यांनी आपले साहित्य व लोखंडी पेटी ठेवली होती.
त्यानंतर सध्या यांची अहमदनगर येथे बदली झाली. ते अधूनमधून पुण्यात येत असतात.

२१ मार्च ते १२ ऑगस्ट दरम्यान चोरट्याने आर्मी बेस वर्कशॉपचे खिडकी तोडून आत प्रवेश केला.
लोखंडी पेटीची कुलूप तोडून त्यातील २५ हजार रुपयांचे पिस्टल व २ हजार रुपयांचे पिस्टलचे २० जीवंत काडतुसे चोरुन नेले. नुकतेच ते पुण्यात आल्यानंतर चोरीचा हा प्रकार उघडकीस आला. पोलीस उपनिरीक्षक मगदुम (PSI Magadum) तपास करीत आहेत.

 

Related Posts