IMPIMP

Post Office Scheme | 14 लाख रुपयांचा फंड बनवण्यासाठी Post Office च्या योजनेत रोज करायचेत केवळ 95 रुपये जमा

by nagesh
Post Office Franchise | post office franchise best investment scheme for business

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – Post Office Scheme | भारतीय पोस्ट विभाग अनेक लहान बचत योजना चालवते. पोस्ट ऑफिसच्या या योजना खूप लोकप्रिय आहेत कारण त्या चांगला रिटर्न देतात, गुंतवणूक देखील पूर्णपणे सुरक्षित आहे. सुमंगल ग्रामीण पोस्टल जीवन विमा योजना (Sumangal Rural Postal Life Insurance Scheme) ही देखील एक उत्तम गुंतवणूक योजना आहे. या योजनेत, दररोज 95 रुपये जमा करूनही, एखादी व्यक्ती 14 लाख रुपयांचा निधी तयार करू शकते. ग्राम सुमंगल योजनेची पॉलिसी घेण्यासाठी वयोमर्यादा 19 वर्षे ते 45 वर्षे आहे. कोणताही भारतीय नागरिक याचा लाभ घेऊ शकतो. (Post Office Scheme)

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

सुमंगल ग्रामीण पोस्टल जीवन विमा योजना ही एक एंडोमेंट योजना आहे. ज्यांना वेळोवेळी पैशांची गरज असते त्यांच्यासाठी ही योजना अतिशय योग्य आहे. यामध्ये विमाधारक व्यक्ती जिवित राहिल्यास त्याला मनी बॅक लाभ मिळतो. म्हणजे विमाधारकाला त्याने गुंतवलेले पैसे परत मिळतील आणि विमा संरक्षणही मिळेल. (Post Office Scheme)

 

मिळेल मनी बॅकचा लाभ

या योजनेत 10 लाख रुपयांची विमा रक्कम आहे. म्हणजेच पॉलिसीधारकाचा मृत्यू झाल्यास कुटुंबाला 10 लाख रुपये अधिक बोनसची रक्कम मिळते.
या पॉलिसीचा कालावधी 15 आणि 20 वर्षांचा आहे. 15 वर्षांच्या पॉलिसी अंतर्गत, 6, 9 आणि 12 वर्षे पूर्ण झाल्यावर विम्याच्या रकमेच्या 20-20 टक्के रक्कम मनी-बॅक म्हणून मिळते.
उर्वरित 40 टक्के रक्कम बोनससह मॅच्युरिटीवर मिळते.
20 वर्षांच्या पॉलिसीमध्ये, 8, 12 आणि 16 वर्षांमध्ये, 20-20 टक्के रक्कम मनी बॅक म्हणून मिळते आणि उर्वरित 40 टक्के रक्कम मॅच्युरिटीवर बोनससह मिळते. (Post Office Scheme)

 

असा बनवा 14 लाखांचा निधी

जर एखाद्या व्यक्तीने ही पॉलिसी 20 वर्षांसाठी वयाच्या 25 व्या वर्षी 7 लाख विमा रकमेसह (Sum Assured) घेतली,
तर त्याला दररोज 95 रुपये प्रीमियम भरावा लागेल.
म्हणजेच त्याला दरमहा 2850 रुपये जमा करावे लागतील.
3 महिन्यांसाठी हप्ते भरल्यास, तुम्हाला 8,850 रुपये आणि 6 महिन्यांसाठी तुम्हाला 17,100 रुपये भरावे लागतील.
अशा प्रकारे गुंतवणूक केल्याने, तुम्हाला मॅच्युरिटीवर सुमारे 14 लाख रुपये मिळतील.

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

Web Title :-  Post Office Scheme | post office sumangal rural postal life insurance scheme gives14 lakh rupees on daily deposit 95 rupees

 

हे देखील वाचा :

Home Stay | ‘होम स्टे” बनला गावातील तरूणांचा रोजगाराचा मार्ग; जाणून घ्या ‘होम स्टे’ म्हणजे काय?

LIC MCap | आता टॉप-10 कंपन्यांच्या यादीतून बाहेर फेकली गेली एलआयसी, इतके झाले मार्केट कॅप

How To Get Rid Of Periods Rash | पीरियड्सनंतर त्रस्त करत असतील पीरियड रॅश, तर जाणून घ्या कारणे आणि बचावाचे उपाय

NEMS School | एनईएमएस शाळेत घुमला गणपती ‘बाप्पा मोरया’ चा नाद

 

Related Posts