IMPIMP

PPF Account | पीपीएफ खाते दुसर्‍या बँकेत ट्रान्सफर करणे आता झाले आणखी सोपे, या 5 स्टेपमध्ये करावे लागेल अप्लाय

by nagesh
Changes In PPF | changes in ppf account rules major changes in public provident fund know before investment

नवी दिल्ली : वृत्त संस्थाPPF Account | काही करणास्तव तुम्हाला तुमचे पीपीएफ खाते (PPF account) एका बँकेतून दुसर्‍या बँकेत ट्रान्सफर करायचे असेल तर आता ही प्रक्रिया सोपी झाली आहे. केवळ 5 टेप्समध्ये तुम्ही यासाठी ऑनलाइन अप्लाय करू शकता. ही प्रक्रिया कशी आहे ते सविस्तर जाणून घेवूयात…

 

 

Join our Sarkarsatta WhatsApp Group Link , Telegram, Facebook page for every update

 

 

 

PPF Account कसे ट्रान्सफर करावे?

एका व्यक्तीकडे एकापेक्षा जास्त पीपीएफ खाती असू शकत नाहीत. यासाठी तुम्हाला तुमचे पीपीएफ खाते मागील बँकेतून दुसर्‍या बँकेत ट्रान्सफर करावे लागेल. मात्र, यामध्ये काही आठवडे लागू शकतात. यासाठी खाली स्टेप फॉलो करा –

  •  PPF पासबुकसह सध्याच्या बँकेच्या शाखेत जा आणि ट्रान्सफरासाठी अर्ज करा. अर्जात त्या बँक शाखेचा पूर्ण उल्लेख असावा जिथे तुम्हाला खाते ट्रान्सफर करायचे आहे.
  • जुने पासबुक बँकेत जमा करा.
  •  यानंतर बँक आपल्या सिस्टमध्ये तुमचे पीपीएफ खाते बंद करेल आणि काही कागदपत्रे नवीन बँकेच्या शाखेला पाठवले. यामध्ये या कागदपत्रांचा समावेश असेल –

– खात्याची प्रमाणित कॉपी

– मूळ खाते उघडण्याचा अर्ज

– नामांकन अर्ज

– हस्ताक्षराचा नमूना

– बाकी रक्कमेचा चेक किंवा डिमांड ड्राफ्ट

– सध्याचे PPF Passbook ग्राहकाद्वारे जमा केलेले पीपीएफ ट्रान्सफ र विनंती पत्र आणि बँकेचे अ‍ॅकनॉलेजमेंट

* ही सर्व कागदपत्रे मिळाल्यानंतर नवीन बँक तुम्हाला याबाबत कळवेल. तुम्हाला तुमच्या सर्व कागदपत्रांसह नवीन खाते उघडण्याचा फॉर्म जमा करावा लागेल. नंतर नवीन बँक तुम्हाला नवीन पासबुक जारी करेल.

आता या बदललेल्या बँकेच्या पीपीएफ खात्यात सहजपणे पैसे जमा करण्यासाठी आपले सेव्हिंग अकाऊंट पीपीएफ अकाऊंट किंवा PPF account सोबत लिंक करू शकता. याची पद्धत पुढील प्रमाणे –

 

Join our Sarkarsatta WhatsApp Group Link , Telegram, Facebook page for every update

 

 

 

  •  ही प्रक्रिया तशीच आहे जशी की थर्ड पार्टी पे चा समावेशक करण्यासाठी अवलंबतात.
  •  नेट बँकिंगमध्ये लॉग इन करा आणि आपला पीपीएफ अकाऊंट नंबर आणि आयएफएससी कोड एकत्र करा.
  •  खाते लिंक केल्यानंतर तुम्ही डिजिटल प्रकारे फंड ट्रान्सफर करण्याचा पर्याय निवडू शकता.
  •  तुम्ही दर महिना पीपीएफ खात्यात जमा करण्यासाठी ईसीएस (इलेक्ट्रॉनिक क्लियरिंग मँडेट) चा पर्याय सुद्धा निवडू शकता.
  •  पीपीएफ खात्यासाठी व्याजाची गणना करताना, दरमहिन्याच्या पाचव्या आणि शेवटच्या दरम्यान खात्याच्या शिल्लक रक्कमेवर विचार केला जातो.

यासाठी, रिटर्न जास्त वाढवण्यासाठी, ठरवा की, दर महिन्याच्या पाचव्या तारखेपूर्वी अशा प्रकारची जमा रक्कम जमा कराल.

 

Web Title : PPF Account | how to transfer ppf account from one bank to other bank branch and link your ppf to saving account

 

हे देखील वाचा :

Pune Corona | पुणे शहरात गेल्या 24 तासात ‘कोरोना’च्या 88 रुग्णांना डिस्चार्ज, जाणून घ्या इतर आकडेवारी

Narayan Rane | नारायण राणेंचा खोचक टोला; म्हणाले – ‘मिलिंद नार्वेकर म्हणजे नवे शिवसेनाप्रमुख का?’

Post Office Scheme | पोस्ट ऑफिसच्या ‘या’ योजनेत मिळते गॅरेंटेड व्याज, जाणून घ्या ‘या’ सरकारी योजनेचे फायदे

 

Related Posts