IMPIMP

Pratap Sarnaik | शिंदे गटात जाऊन देखील प्रताप सरनाईक यांच्यावर कारवाईची टांगती तलवार, ईडी करणार एवढ्या कोटींची संपत्ती जप्त

by nagesh
MLA Pratap Sarnaik | MLA pratap sarnaik taunts uddhav thackeray saying that cm shinde given 1800 crores fund for development thane

मुंबई : सरकारसत्ता ऑनलाईन  – शिवसेना (Shivsena) आमदार प्रताप सरनाईक (Pratap Sarnaik) यांच्यावर ईडीची कारवाई सुरू झाली होती. यानंतर ते शिंदे गटासोबत (Shinde Group) थेट सुरत आणि गुवाहटीमध्ये दिसले होते. ईडीची चौकशी टाळण्यासाठी सरनाईक आणि यामिनी जाधव (Yamini Jadhav) शिंदे गटात गेल्याचा आरोप होत होता. मात्र, आता पुन्हा सरनाईक ईडीच्या रडारवर आले आहेत. दरम्यान, सरनाईक (Pratap Sarnaik) यांचा ठाण्यातील आमदारकीचा मतदार संघ भाजपाला (BJP) देण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) आग्रही असल्याच्या कारणावरून दोघांमध्ये वाद सुरू झाल्याचे वृत्त काही दिवसांपूर्वी प्रसिद्ध झाले होते. त्यानंतर पुन्हा प्रताप सरनाईक हे नाराज असल्याचे वृत्त होते.

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

ईडीने (ED) जप्त केलेली 11. 4 कोटींची संपत्ती योग्य असल्याचा निर्णय क्वाशी ज्युरीशरी बॉडीने दिला आहे. प्रताप सरनाईक यांची NSEL घोटाळा प्रकरणात 11.4 कोटींची संपत्ती जप्त करण्यात आली होती. मार्चमध्ये ईडीने त्यांचे ठाण्यातील दोन फ्लॅट आणि मीरा रोडमधील जमिनीचे प्लॉट जप्त केले होते. या कारवाईविरोधात सरनाईक यांनी क्वाशी ज्युरीशरी बॅाडीकडे आव्हान दिले होते. मात्र, ईडीची जप्तीची कारवाई योग्य असल्याचा निर्णय देण्यात आला आहे. त्यानंतर आता जप्त केलेली संपत्ती ईडी ताब्यात घेणार आहे.

 

एनएसईएल मनी लाँड्रिंग प्रकरणात (Money Laundering Case) आमदार प्रताप सरनाईक (Pratap Sarnaik) यांची 11.4 कोटी रुपयांची मालमत्ता जप्त केल्याच्या वृत्ताला ईडीने दुजोरा दिला आहे. 2016 मध्ये दाखल करण्यात आलेल्या तक्रारीआधारे आर्थिक गुन्हे शाखा, मुंबई पोलिसांनी (Mumbai Police, Crime Branch) एनएसईएल प्रकरणात त्याचे संचालक आणि एनएसईएलचे प्रमुख अधिकारी एनएसईएलचे 25 जण आणि इतरांवर मनी लाँड्रिंग तपास सुरू केला होता. आरोपींनी गुंतवणुकदारांची फसवणूक (Fraud Case) करण्याचा गुन्हेगारी कट रचला, त्यांना नॅशनल स्पॉट एक्सचेंज लिमिटेडच्या (National Spot Exchange Limited) प्लॅटफॉर्मवर व्यापार करण्यास प्रवृत्त केले आणि बोगस वेअरहाऊस पावत्यांसारखी बनावट कागदपत्रे तयार केली, बनावट खाती तयार केली, असे आरोप आहेत.

 

दरम्यान, काही दिवसांपूर्वी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि आमदार प्रताप सरनाईक यांच्यात आमदारकी प्रभाग सोडण्यावरून वाद सुरू असल्याच्या काही बातम्या प्रसिद्ध झाल्या होत्या. ठाण्यातील ओवळा माजिवाडा मतदारसंघ हा शिवसेनेचा आहे. प्रताप सरनाईक हे ओवळा माजिवाडा मतदारसंघाचे आमदार आहेत.
हा मतदारसंघ प्रताप सरनाईक यांनी सोडावा आणि हा मतदारसंघ भाजपला देण्यात यावा यावरून
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि आमदार प्रताप सरनाईक यांच्यात खडाजंगी सुरू झाली होती, असे वृत्त काही दिवसांपूर्वी समोर आले होते.

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

मात्र ही बातमी फसवी असल्याची प्रतिक्रिया प्रताप सरनाईक (Pratap Sarnaik) यांचे पुत्र
माजी नगरसेवक पूर्वेश सरनाईक (Purvesh Sarnaik) यांनी दिली होती.
त्याच बरोबर पूर्वेश यांनी ट्विटरच्या माध्यमातून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि प्रताप सरनाईक यांचे फोटो टाकून !!
दो दिल और एक जान है हम !! असे ट्विट केले होते. मात्र, याबाबत प्रताप सरनाईक यांनी कुठल्याही प्रकारची
प्रतिक्रिया देण्यास नकार दिला होता.

 

 

Web Title :- Pratap Sarnaik | ed attachment of sarnaiks 1 cr property confirmed

 

हे देखील वाचा :

Bachchu Kadu | फडणवीसांच्या भेटीपूर्वी बच्चू कडू म्हणाले – ‘मला वाद वाढवायचा नाही, कडू-राणा वादावर…’

Supriya Sule | कवितेच्या माध्यमातून खा. सुळेंचे संभाजी भिडेंवर टीकास्त्र ‘तू लाव टिकली, परंपरेच्या बाजारात अक्कल आम्ही विकली‘

Pune Crime | व्यसनी मुलाच्या डोक्यात कुर्‍हाडीने वार करुन वडिलांनी केला खून, मावळ मधील घटना

 

Related Posts