IMPIMP

President Draupadi Murmu | पश्चिम बंगालच्या मंत्र्यांचे राष्ट्रपती विरोधात वादग्रस्त विधान; म्हणाले – ‘आपल्या राष्ट्रपती कशा दिसतात?’

by nagesh
President Draupadi Murmu | tmc minister akhil giri controversial statement president draupadi murmu look

पश्चिम बंगाल : सरकारसत्ता ऑनलाईन – पश्चिम बंगाल (West Bengal) मंत्रीमंडळातील मंत्री आणि तृणमूलचे काँग्रेसचे (TMC Leader) नेते अखिल गिरी (Akhil Giri) यांनी शुक्रवारी एका कार्यक्रमात बोलताना वादग्रस्त विधान केले आहे. उपस्थितांशी बोलत असताना त्यांनी भारताच्या राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू (President Draupadi Murmu) यांच्याबद्दल अतिशय निंदाजनक वक्तव्य केले आहे. पश्चिम बंगालमधील विरोधी पक्षनेते आणि भाजपा आमदार सुवेंदू अधिकारी (BJP Leader Suvendu Adhikari) यांच्यावर टीका करताना अखिल गिरी यांनी राष्ट्रपतींविषयी (President Draupadi Murmu) हे वादग्रस्त विधान केलं.

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

 

अखिल गिरी आणि सुवेंदू अधिकारी यांच्यात वाद रंगला होता. त्यामुळे एका कार्यक्रमाच्या वेळी अखिल गिरी यांनी सुवेंदू अधिकारी यांना उद्देशूनही टीका करत होते. ते म्हणाले, “सुवेंदू अधिकारी म्हणतात, मी चांगला दिसत नाही. मग सुवेंदू अधिकारी तरी किती सुंदर दिसता? आपण कुणाचंही मूल्यमापन त्यांच्या दिसण्यावरून करत नाही. आपण देशाच्या राष्ट्रपतींचा नक्कीच सन्मान करतो. पण आपल्या राष्ट्रपती कशा दिसतात?” असा प्रश्न उपस्थित करून गिरी उपस्थितांकडे बघून हसू लागले.

 

भारताच्या राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्याविषयी तृणमूलच्या काँग्रेसच्या मंत्री जे वादग्रस्त विधान केले ते आता
व्हिडीओद्वारे आता सामाजिक माध्यमावर पसरत आहे. राष्ट्रपतींच्या पदाचा आदर, मान-सन्मान हा राखलाच
गेला पाहिजे, अशा भावना सगळीकडे व्यक्त होत आहेत. तर दुसरीकडे भाजपने या विधानाला आदिवासी विरोधी
म्हणाले आहे. शिवाय ममता बॅनर्जी (Mamata Banerjee) यांना सुद्धा या वादात खेचण्याचा प्रयत्न भाजपकडून केला आहे.

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

Web Title :- President Draupadi Murmu | tmc minister akhil giri controversial statement president draupadi murmu look

 

हे देखील वाचा :

Pune Crime | पुण्यात मार्केटयार्ड परिसरात गोळीबार करुन 28 लाखांची रोकड लुटली, दिवसाढवळ्या घडलेल्या प्रकारामुळे खळबळ

Pune Pimpri Crime | पनवेल महापालिकेत नोकरी लावण्याचे आमिष दाखवून तरुणाला लाखोंचा गंडा, 3 जणांना अटक

Deepak Kesarkar | …म्हणून दीपक केसरकर आणि नितेश राणे यांची युती

NCP MLA Jitendra Awhad | जितेंद्र आव्हाडांना मोठा झटका, विवियाना मॉल मारहाण प्रकरणी न्यायालयीन कोठडी

 

Related Posts