IMPIMP

Pune Accident News | डंपरच्या अपघातात 8 वर्षीय मुलाचा मृत्यू; नागरिकांनी डंपर पेटविला, मंतरवाडी परिसरातील घटना (Video)

by sachinsitapure
Pune Mantarvadi Accident

पुणे : सरकारसत्ता ऑनलाईन – Pune Accident News | पुण्यातील मंतरवाडी येथे भरधाव वेगात आलेल्या डंपरने दुचाकीला धडक दिली. यामध्ये 8 वर्षाच्या चिमुकला खाली पडून डंपर खाली आल्याने त्याचा जागीच मृत्यू (Death) झाला. यानंतर संतापलेल्या जमावाने डंपर पेटवला. तर काही नागरिकांनी दगडफेक देखील केली. याप्रकरणी हडपसर पोलिसांनी (Pune Police) डंपरचालकाला अटक केली आहे. ही घटना बुधवारी (दि.27) दुपारी मंतरवाडी कात्रज बायपास येथील एच.पी. पेट्रोल पंपाच्या बाजूला घडली. (Pune Accident News)

Join Our SarkarsattaWhatsapp GroupTelegram GroupFacebook Page for every Update

शौर्य सागर आव्हाळे Shaurya Sagar Avhale (वय 8, रा. आव्हाळवाडी, हवेली) असे अपघातात मृत्यू झालेल्या चिमुकल्या मुलाचे नाव आहे. या प्रकरणी अक्षय बाबासाहेब भाडळे Akshay Babasaheb Bhadale (वय 26, रा. उरूळी देवाची) यांनी हडपसर पोलीस ठाण्यात (Hadapsar Police Station) फिर्याद दिली आहे. पोलिसांनी डंपरचालक बालाजी कोंडीबा पोले (वय 30, रा. हवेली) याला अटक केली आहे. (Pune Accident News)

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांची बहीण कोमल ही मुलगा शौर्य आणि मुलगी तृणल या दोघांना दुचाकीवरुन मंतरवाडी येथून घरी जात होती. त्यावेळी एच.पी. पेट्रोल पंपाजवळ आली असता, पाठीमागून भरधाव वेगात डंपर चालकाने (एमएच 12 टीव्ही 4974) ओव्हरटेक करण्याचा प्रयत्न केला. यावेळी डंपरची दुचाकीला धडक बसली. यामुळे दुचाकी रस्त्यावर पडली. दुचाकीवर पाठीमागे बसलेला 8 वर्षाचा शौर्य हा डंपरच्या चाकाखाली सापडल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला.

या अपघातानंतर डंपर चालक गाडी रस्त्याच्या बाजूला लावून पळून गेला.
घटनेमुळे संतप्त झालेल्या जमावाने डंपर पेटवून (Dumper Set on Fire) दिला.
तर काहींनी दगड फेक केली. घटनेची माहिती मिळताच हडपसर पोलीस ठाण्यातील पोलीस अधिकारी व
कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली.
त्यांनी अग्निशमन दलाला (Pune Fire Brigade) बोलावत डंपरला लागलेली आग विझवली.

डंपर पेटवणाऱ्यांवर गुन्हा दाखल

दरम्यान, हडपसर पोलिसांनी डंपर चालकावर गुन्हा दाखल करुन अटक केली आहे.
तर डंपर पेटवणाऱ्या तीन ते चार जणांवर पोलिसांनी गुन्हा (FIR) दाखल केला आहे.
याबाबत गणेश सुरेश बांदल (वय-37 रा. वडाची वाडी, पुणे) यांनी हडपसर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

Related Posts