IMPIMP

Pune Court | डॉ. नरेंद्र दाभोलकर हत्या प्रकरणातील आरोपींविरोधात 13 पुरावे न्यायालयात सादर; आरोपींच्या वकिलांनी केली ‘ही’ मागणी

by nagesh
Pune Court | Dr. narendra dabholkar murder case 13 pieces of evidence presented in court against accused today

पुणे : सरकारसत्ता ऑनलाइन Pune Court | अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे कार्याध्यक्ष डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या हत्या प्रकरणातील (Dr. Narendra Dabholkar Murder Case) आरोपीविरोधात तेरा पुरावे केंद्रीय अन्वेषण विभागातर्फे (central bureau of investigation) शुक्रवारी न्यायालयात (Pune Court) सादर करण्यात आले.

 

 

 

Join our Sarkarsatta WhatsApp Group Link , Telegram, facebook page for every update

 

 

 

मृत्यूची कारणे, मृत्यूची वैद्यकीय सूचना, फॉरेन्सिक प्रयोगशाळांचे अहवाल, घटनास्थळाचा पंचनामा, आरोपी संजीव पुनाळेकर (adv. sanjeev punalekar) यांच्या कार्यालयातून दोन लॅपटॉप जप्त केल्याचा आणि आरोपींच्या छायाचित्रांचा मेमो यासह तेरा पुराव्यांचा त्यात समावेश आहे. गुन्ह्यातील पाच डॉ. वीरेंद्रसिंह तावडे (adv virendrasingh tawade), शरद कळसकर (sharad kalaskar), सचिन अंदुरे (sachin andure), ॲड. संजीव पुनाळेकर आणि विक्रम भावे (Vikram Bhave) यांच्यावर ही आरोप निश्चिती करण्यात आली. आरोपींनी मात्र गुन्हा कबूल नसल्याचे न्यायालयाला (Pune Court) सांगितले. त्यामुळे आता सरकार व बचाव पक्षातर्फे पुराव्यासंबंधीची कागदपत्रे सादर केली जाणार होती.

सीबीआयने सादर केलेल्या कागदपत्रांपैकी कोणती कागदपत्रे मान्य आहेत, हे बचाव पक्षातर्फे पुढील सुनावणीत सांगितले जाणार आहे.
त्यानंतर सरकार पक्षातर्फे साक्षीदारांची यादी (लिस्ट ऑफ विटनेस) सादर केली जाणार आहे,
अशी माहिती विशेष सरकारी वकील प्रकाश सूर्यवंशी (Special Public Prosecutor Prakash Suryavanshi) यांनी दिली.
या सुनावणीला आरोपी डॉ. तावडे आणि न्यायालयाच्या आदेशाप्रमाणे औरंगाबादमधील हर्सूल मध्यवर्ती कारागृहातून (aurangabad harsul jail) स्थलांतरित केलेला आरोपी सचिन अंदुरे हे दोघे येरवडा मध्यवर्ती कारागृहातून (Yerwada Jail) तर आरोपी शरद कळसकर मुंबईतील आर्थर रोड कारागृहातून (arthur road jail, mumbai) व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे हजर होते.

 

 

 

Join our Sarkarsatta WhatsApp Group Link , Telegram, facebook page for every update

 

 

जामिनावर असलेले आरोपी अ‍ॅड. संजीव पुनाळेकर आणि विक्रम भावे प्रत्यक्ष हजर होते. आरोपी कळसकर याला ताबडतोब येरवडा कारागृहात हलविण्याचे आदेश न्यायालयाने आर्थर रोड कारागृह प्रशासनाला दिले.
आरोपींच्या वतीने अ‍ॅड. प्रकाश साळसिंगीकर (Add. Prakash Salsingikar) यांनी बाजू मांडली.
या प्रकरणातही सीलबंद स्वरूपात केस डायरी देण्याची मागणी बचाव पक्षातर्फे ॲड. प्रकाश साळसिंगीकर यांनी केली.
विशेष सरकारी वकिलांनी हरकत न घेतल्याने ही मागणी मान्य करण्यात आली.
पुढील सुनावणीस सरकार पक्षातर्फे केस डायरी सीलबंद स्वरूपात दिली जाणार आहे. या प्रकरणाची पुढील सुनावणी 6 ऑक्टोबर रोजी होणार आहे.

 

Web Title :- Pune Court | Dr. narendra dabholkar murder case 13 pieces of evidence presented in court against accused today

 

हे देखील वाचा :

Pravin Darekar | प्रविण दरेकरांचा संतप्त सवाल, म्हणाले-‘मुख्यमंत्री म्हणतात पंचनामे करा, मंत्री म्हणतात पंचनामे न करता मदत करा, नेमकं काय करणार आहात?

Post Office Schemes Provide Loan | पोस्ट ऑफिसच्या कोण-कोणत्या योजनांवर मिळते कर्जाची सुविधा, जाणून घ्या संपूर्ण प्रक्रिया

Amarinder Singh | कॅप्टन अमरिंदर सिंह यांना केंद्रात मोठी जबाबदारी मिळणार?, भाजप नेत्याचा दावा

 

Related Posts