IMPIMP

Pravin Darekar | प्रविण दरेकरांचा संतप्त सवाल, म्हणाले-‘मुख्यमंत्री म्हणतात पंचनामे करा, मंत्री म्हणतात पंचनामे न करता मदत करा, नेमकं काय करणार आहात?

by nagesh
Pravin Darekar | CM uddhav thackeray says do panchnama minister says help without panchnama what are you going to do everybody

पुणे : सरकारसत्ता ऑनलाइन  गुलाब चक्रीवादळामुळे (gulab cyclone) मराठवाड्यात मुसळधार पाऊस (Heavy rain in Marathwada) पडत आहे. त्यामुळे शेतकऱ्यांची सर्व पिकं पाण्याखाली जाऊन मोठे नुकसान झाले आहे. यावरुन विरोधी पक्षनेते प्रविण देरेकर (Pravin Darekar) यांनी राज्य सरकारवर (state government) निशाणा साधला आहे. मुख्यमंत्री (CM) म्हणतात पंचनामे (panchnama) करा व सरकारमधील मंत्री म्हणतात पंचनामे न करता मदत करा. त्यामुळे शेतकऱ्यांसाठी नेमकं काय करणार आहात ते सांगा, असा संतप्त सवाल प्रविण दरेकर (Pravin Darekar) यांनी केला आहे. ते पुण्यातील पत्रकार परिषदेत बोलत होते.

 

 

Join our Sarkarsatta WhatsApp Group Link , Telegram, facebook page for every update

 

 


पाहणी दौरा करणार

मराठवाड्यामध्ये मोठ्या प्रमाणात अतिवृष्टी झाल्याने या भागात मोठे नुकसान झाले आहे. तसेच मनुष्यहानी देखील झाली आहे.
शेतकऱ्यांचा आक्रेश, व्यथा प्रसारमाध्यमांच्या माध्यमातून दिसत आहेत. या पार्श्वभूमीवर देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis)
यांनी कालच केंद्रीय कृषिमंत्री (Union Agriculture Minister) यांच्याशी चर्चा केली आहे.
पूर भागाच्या पाहणीसाठी देवेंद्र फडणवीस आणि मी दोन दिवसांनी मराठवाड्याच्या दौऱ्यावर जाणार असल्याचे प्रविण दरेकर (Pravin Darekar) यांनी सांगितले.

राज्य सरकारने मदत जाहीर करावी

प्रविण दरेकर म्हणाले, ऐवढे दिवस उलटून सुद्धा शेतकऱ्यांना कोणत्याही प्रकारची मदत राज्य सरकारकडून जाहीर करण्यात आलेली नाही.
मंत्री धनंजय मुंडे (Dhananjay Munde) यांनी पंचनामे न करता मदत देण्याची मागणी केली.
त्यावर दोन दिवसांत मदत केली जाणार असल्याचे विजय वडेट्टीवार (Vijay Vadettiwar) यांनी सांगितले.
मात्र, मुख्यमंत्री म्हणतात पंचनामे करा व सरकारमध्ये मंत्री म्हणतात पंचनामे न करता मदत करा.
त्यामुळे शेतकऱ्यांसाठी नेमकं काय करणार आहेत ते सांगा, असे दरेकर म्हणाले.

 

 

Join our Sarkarsatta WhatsApp Group Link , Telegram, facebook page for every update

 

 

ओला दुष्काळ जाहीर करा

दरेकर पुढे म्हणाले, आमची मागणी आहे की तात्काळ ओला दुष्काळ जाहीर करावा तसेच पंचनामे करायचे तेव्हा करा परंतु आता तात्कालीक मदत शेतकऱ्यांना देण्याची आवश्यकता आहे.
कारण वराती मागून घोडे नाचवून काहीही उपयोग नाही, अशा शब्दांत दरेकर यांनी राज्य सरकारला सुनावले.

 

Web Title : Pravin Darekar | CM uddhav thackeray says do panchnama minister says help without panchnama what are you going to do everybody

 

Pravin Darekar | आसमानी संकटाने शेतकरी हवालदील, तरीही सरकारला प्रतीक्षा अहवालाची – प्रवीण दरेकर

Pravin Darekar | ‘माझ्याकडे बोट दाखवून संधी दिलीय, आता पुण्यासह इतर जिल्हा बँकेचे घोटाळे काढणार’ – प्रवीण दरेकर (व्हिडीओ)

 

Related Posts