IMPIMP

Pune Crime | दोन पेट्रोलपंपावर दरोडा टाकणारी टोळी पुणे ग्रामीण पोलिसांकडून गजाआड

by nagesh
Pune Crime | A gang that robbed two petrol pumps was busted by the Pune Rural Police

पुणे : सरकारसत्ता ऑनलाईन – Pune Crime | शिरूर पोलीस ठाण्याच्या (Shirur Police Station) हद्दीमधील पाषाणमळा आणि न्हावरा गावाच्या हद्दीमधील पेट्रोल पंपावर दरोडा (Petrol Pump Robbery) टाकणाऱ्या टोळीला पुणे ग्रामीण पोलिसांच्या (Pune Rural Police) स्थानिक गुन्हे शाखेने (Local Crime Branch (LCB) बेड्या ठोकल्या आहेत. अटक करण्यात (Pune Crime) आलेल्या टोळीने शनिवारी (दि.12) पाषणमळा आणि बुधवारी (दि.15) न्हावरा गावच्या हद्दीतील पेट्रोलपंपावर दरोडा टाकला होता.

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

करण युवराज पठारे (वय-20 रा. गुजरमळा, शिरुर मुळरा. रायगव्हाण, ता. श्रीगोंदा), रोहन सोमनाथ कांबळे (वय-20 रा. बोऱ्हाडेमळा, शिरुर), अजय जगन्नाथ माळी (वय-23), अजय सोमनाथ लकारे (वय-21 दोघे रा. माठ, नेहरवाडी, ता. श्रीगोंदा, जि. अहमदनगर) अशी अटक (Arrest) केलेल्या आरोपींची नावे आहेत. तर त्यांचे दोन साथिदार फरार आहेत. (Pune Crime)

 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शिरुर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील पाषाणमळा येथील शिवसाई फ्युअल स्टेशन (Shiv Sai Fuel Station) या इंडियन ऑयल कॉर्पोरेशन लि. (Indian Oil Corporation Ltd.) पेट्रोलपंपावर शनिवारी अज्ञात चोरट्यांनी दुचाकी वरुन येऊन पंपावरील कर्मचाऱ्यांना कोयत्याचा धाक दाखून 49 हजार 400 रुपये व एक मोबाईल चोरुन नेला. या गुन्ह्याचा तपास सुरू असताना न्हावरा गावाच्या हद्दीमधील आयओका पेट्रोलीयम या एच.पी. कंपनीच्या (H.P. Company) पेट्रोलपंपावर सहा जणांनी कामगारांना कोयत्याचा धाक दाखवून 1 लाख 2 हजार रुपये रोख, मोबाईल असा मुद्देमाल चोरुन नेला होता. चार दिवसात दरोड्याचे दोन गुन्हे घडले.

 

पोलीस अधीक्षक अंकित गोयल (SP Ankit Goyal) यांनी हे दोन्ही गुन्हे उघडकीस आणण्याच्या सुचना स्थानिक
गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अविनाश शिळीमकर (Police Inspector Avinash Shilimkar) यांना दिले होते.
एलसीबीच्या पथकाने सीसीटीव्ही फुटेज तपासून तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे व गोपनीय माहिती प्राप्त करुन
आरोपींना अटक केली. आरोपींकडे केलेल्या सखोल चौकशीत त्यांनी दोन्ही गुन्ह्याची कबुली दिली आहे.
पोलिसांनी आरोपींकडून गुन्ह्यात वापरलेले चार कोयते जप्त केले आहेत.
पुढील तपासासाठी आरोपींना शिरुर पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे.
पुढील तपास पोलीस निरीक्षक सुरेशकुमार राऊत (Police Inspector Suresh Kumar Raut) करीत आहेत.

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

ही कारवाई पोलीस अधीक्षक अंकित गोयल, अपर पोलीस अधीक्षक मितेश घट्टे (Addl SP Mitesh Ghatte),
उप विभागीय पोलीस अधिकारी यशवंत गवारी (Deputy Divisional Police Officer Yashwant Gawari)
यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अविनाश शिळीमकर,
सहायक पोलीस निरीक्षक सचिन काळे (API Sachin Kale), पोलीस उपनिरीक्षक गणेश जगदाळे
(PSI Ganesh Jagdale), अमित सिद-पाटील (PSI Amit Sid-Patil), पोलीस अंमलदार तुषार पंदारे,
राजु मोमीन, जनार्दन शेळके, गुरु जाधव, मंगशे थिगळे, योगेश नागरगोजे, मुकुंद कदम यांच्या पथकाने केली.

 

Web Title :- Pune Crime | A gang that robbed two petrol pumps was busted by the Pune Rural Police

 

हे देखील वाचा :

Amol Mitkari | ‘भगतसिंग कोश्यारी यांच्या काळ्या टोपीखालचा सडका मेंदू’ – अमोल मिटकरी

T-20 World Cup | टी-20 विश्वचषकातील पराभव BCCI च्या जिव्हारी लागल्याने निवड समिती केली बरखास्त

Chhagan Bhujbal | ‘राहुल गांधी यांच्या भारत जोडो यात्रेमुळे देशात परिवरर्तन होईल’ – छगन भुजबळ

MPSC PSI Recruitment | पोलीस उपनिरीक्षक लेखी परिक्षेत उत्तीर्ण झालेल्या उमेदवारांची शारीरिक चाचणी व प्रमाणपत्र पडताळणी ‘या’ कालावधीत होणार

 

Related Posts