IMPIMP

Pune Crime | दुर्देवी ! काही दिवसातच होतं लग्न अन् काळाने केला मोठा घात…

by nagesh
Jalna Crime News | hair braid stuck in threshing machine woman farmer dies

पुणे : सरकारसत्ता ऑनलाइन Pune Crime | पुण्यातील एक काळीज पिळवटुन टाकणारी घटना घडली आहे. पुणे (Pune Crime) येथून लग्नाची
खरेदी करुन बहीण-भाऊ दुचाकीवरुन घरी परतताना दौंड (daund) तालुक्यातील वरवंड येथे दुचाकीचा भीषण अपघात (Accident) झाला आहे. या
अपघातात बहीणीचा जागीच दुर्देवी मृत्यू (Died) झाला. पुणे सोलापुर राष्ट्रीय महामार्गाने दुचाकीला पाठीमागुन येणा-या अज्ञात वाहनाने धडक दिल्याने
हा अपघात घडला. ही घटना बुधवारी (19 जानेवारी) रोजी सायंकाळच्या सुमारास घडली. प्रतिक्षा सदाशिव कांबळे (Pratiksha Sadashiv Kamble)
(वय 21, दोघेही रा. मलठण ता. दौंड जि. पुणे ) असं त्या मृत मुलीचं नाव आहे. तर, शुभम सदाशिव कांबळे (Shubham Sadashiv Kamble) असं
जखमी भावाचे नाव आहे.

 

 

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

 

 

याबाबत माहिती अशी, प्रतिक्षा कांबळे हीचा येत्या काही दिवसात विवाह होता. त्या निमित्त सकाळी ती आणि भाऊ शुभम बरोबर पुणे येथे कपडे आदी
खरेदीला गेली होती. सायंकाळी पुणे सोलापूर महामार्गाने (Pune Solapur Highway) ते दुचाकीवरुन घरी परतताना सायकांळी साडे सहा वाजता
वरवंड येथील कौठीचा मळा भागात त्यांच्या दुचाकीला पाठीमागुन येणा-या अज्ञात वाहनाची धडक (Accident) बसली. या अपघातात दुचाकीसह
बहीण-भाऊ रस्त्यावर पडले. वाहनाचे चाक अंगावरुन गेल्याने प्रतिक्षाचा जागीच मृत्यू झाला. तर भाऊ शुभम किरकोळ जखमी झाला आहे. (Pune
Crime)

 

अपघातानंतर भररस्त्यात प्रतिक्षाचा रक्ताच्या थारोळ्यात पडलेला मृतदेह, बाजुला लग्नाच्या खरेदीच्या कपडयांची पिशवी. भावाचा आक्रोश या दृशाने बघ्यांचे काळीज पिळवटुन गेले होते. दरम्यान, याबाबत माहिती समजताच पाटस टोलप्लाझाचे जनसंर्पक अधिकारी वैभव चव्हाण (Vaibhav Chavan) यांनी रुग्णवाहीका घटनास्थळी पाठविली. पोलिस हवालदार घनशाम चव्हाण (Police Constable Ghansham Chavan), अजित इंगवले (Ajit Ingwale), समिर भालेराव (Samir Bhalerao), सुनिल बगाडे (Sunil Bagade) यांनी मृतदेह विच्छेदनासाठी पाठवुन दिला आहे. अपघातानंतर अज्ञात वाहन पलायन झाले आहे. या प्रकरणी रात्री उशीरा पर्यंत गुन्हा दाखल करण्याचे काम सुरु होते.

 

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

 

Web Title : Pune Crime | accident death in daund sister with brother pune crime news

 

हे देखील वाचा :

OBC Reservation NEET, PG | सुप्रीम कोर्टाचा महत्त्वपुर्ण निर्णय ! वैद्यकीय पदव्युत्तर अभ्यासक्रमांमध्ये 27 टक्के OBC आरक्षण कायम

e-EPIC Voter ID Card | शहर किंवा राज्य बदलल्यास नवीन वोटर आयडी कार्डची गरज नाही, निवडणूक आयोगाने सुरू केली नवी सुविधा, जाणून घ्या सविस्तर

Pune Crime | इंदापूरातील धक्कादायक घटना ! सावकाराच्या त्रासाला कंटाळून 30 वर्षीय तरूणाने घेतला गळफास

 

Related Posts