IMPIMP

e-EPIC Voter ID Card | शहर किंवा राज्य बदलल्यास नवीन वोटर आयडी कार्डची गरज नाही, निवडणूक आयोगाने सुरू केली नवी सुविधा, जाणून घ्या सविस्तर

by nagesh
e-EPIC Voter ID Card | digital voter id assembly elections 2022 know how to download e epic voter id card

नवी दिल्ली : वृत्तसंस्था e-EPIC Voter ID Card | या वर्षी अनेक राज्यांमध्ये विधानसभा निवडणुका होणार आहेत. मतदान करण्यासाठी, तुमच्याकडे मतदार ओळखपत्र असणे आवश्यक आहे. तुमचे वोटर आयडी कार्ड हरवले असेल तर काळजी करण्याची गरज नाही. तुम्ही मोबाईल किंवा कॉम्प्युटरद्वारे ते सहजपणे डाउनलोड करू शकता. मतदार ओळखपत्राचा वापर केवळ मत देण्यासाठीच केला जात नाही, तर पत्ता पुरावा म्हणूनही तो एक महत्त्वाचा दस्तऐवज आहे. (e-EPIC Voter ID Card)

 

 

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

 

 

11 व्या राष्ट्रीय मतदार दिनानिमित्त, निवडणूक आयोगाने 25 जानेवारी 2021 रोजी देशभरात डिजिटल व्होटर आयडी कार्ड किंवा इलेक्ट्रॉनिक इलेक्टोरल फोटो आयडी कार्ड (e-EPIC) सुविधा सुरू केली होती. मतदार ओळखपत्राची नॉन-एडिटेबल आणि सुरक्षित PDF आवृत्ती e-EPIC आहे. मोबाईल किंवा कॉम्प्युटरच्या मदतीने डाउनलोड करण्यासोबतच तुम्ही डिजी लॉकरमध्ये ई-ईपीआयसी अपलोड किंवा प्रिंट करू शकता. तुम्ही या सोप्या मार्गांनी e-EPIC डाउनलोड करू शकता. (e-EPIC Voter ID Card)

 

 

कसे डाउनलोड करावे e-EPIC

https://www.nvsp.in/ वर जा आणि e-EPIC कार्ड डाउनलोड करा वर क्लिक करा.

– न्यू यूजर म्हणून लॉगिन/नोंदणी करावी लागेल.

– यानंतर, e-EPIC डाउनलोड वर क्लिक केल्यानंतर, EPIC क्रमांक किंवा फॉर्म संदर्भ क्रमांक प्रविष्ट करा.

– नोंदणीकृत मोबाईल क्रमांकावर पाठवलेला OTP व्हेरिफाय करा.

– यानंतर, तुम्ही Download e-EPIC वर क्लिक करू शकता.

जर मोबाईल क्रमांक ईरोलमध्ये नोंदणीकृत नसेल तर ः

– केवायसी पूर्ण करण्यासाठी ई-केवायसी वर क्लिक करा.

– यानंतर, तुम्हाला फेस लाइव्हनेस व्हेरिफिकेशन पास करावे लागेल.

– केवायसी पूर्ण करण्यासाठी तुमचा मोबाईल नंबर अपडेट करा.

– ही प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर e-EPIC डाउनलोड करा.

 

 

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

 

 

इतरांसाठीही लवकरच उपलब्ध होईल सुविधा
सध्या e-EPIC डाउनलोड सुविधा नोव्हेंबर 2020 नंतर त्या नोंदणीकृत मतदारांसाठी उपलब्ध आहे ज्यांच्याकडे NSVP रेकॉर्डमध्ये एक युनिक मोबाईल नंबर आहे. इतरांसाठी ही सुविधा लवकरच उपलब्ध होईल. (Digital Voter ID)

 

 

जाणून घ्या e-EPIC चे फायदे
राष्ट्रीय मतदार दिनानिमित्त निवडणूक आयोगाने ई-ईपीआयसी सुविधा सुरू केली होती. याचा सर्वात मोठा फायदा म्हणजे मतदारांना प्रत्येक वेळी शहर किंवा राज्य बदलताना नवीन मतदार ओळखपत्रासाठी अर्ज करावा लागणार नाही. ते फक्त त्यांचा पत्ता बदलून कार्डची नवीन आवृत्ती डाउनलोड करू शकतात.

 

 

Web Title :- e-EPIC Voter ID Card | digital voter id assembly elections 2022 know how to download e epic voter id card

 

हे देखील वाचा :

Pune Crime | इंदापूरातील धक्कादायक घटना ! सावकाराच्या त्रासाला कंटाळून 30 वर्षीय तरूणाने घेतला गळफास

Multibagger Stock | अवघ्या एक वर्षात ‘या’ मल्टीबॅगर स्टॉकने दिला 2800% रिटर्न, 1 लाख झाले 29 लाख, तुम्ही खरेदी केले का?

Exercise Mistakes | एक्सरसाईज करताना नेहमी लोक करतात ‘या’ 4 चूका, जाणून घ्या कोणत्या

 

Related Posts