IMPIMP

Pune Crime Firing Murder Case | घोरपडे पेठ खून प्रकरणातील तीन आरोपींना अटक, गुन्हे शाखेने 12 तासात आवळल्या मुसक्या (Video)

by sachinsitapure
Pune Crime Firing Murder Case

पुणे : सरकारसत्ता ऑनलाईन – Pune Crime Firing Murder Case | पुणे शहरातील घोरपडे पेठेत रविवारी (दि.29) मध्यरात्री दोनच्या सुमारास अज्ञात व्यक्तीने घरात शिरून खून केल्याची धक्कादायक घटना घडली होती. या प्रकरणी पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखा युनिट एकच्या पथकाने 12 तासात तीन आरोपींना अटक केली आहे. पाच हजार रुपये देण्यास नकार दिल्याने आरोपींनी खून केल्याचे निष्पन्न झाले आहे. (Pune Crime Firing Murder Case)

Join Our SarkarsattaWhatsapp GroupTelegram GroupFacebook Page for every Update

अनिल रामदेव साहू (वय-35) असे खून झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. तर रोहित संपत कोमकर (वय-33 रा. गुरुवार पेठ, पुणे), गणेश उल्हासराव शिंदे (वय-41 रा. धनकवडी, पुणे) आणि अमन दिपक परदेशी (वय-29 रा. घोरपडे पेठ, पुणे) असे अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. याबाबत मयत व्यक्तीचा भाऊ घुरणकुमार हरिदेव साहु (वय-24 रा. श्रीमंत सुवर्णभारत मित्र मंडळाजवळ, घोरपडी पेठ पुणे मुळ रा. वाजीतपुर, जि. दरभंगा, बिहार) यांनी खडक पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. (Pune Crime Firing Murder Case)

घोरपडे पेठेत घरात घुसून अनिल साहू याच्यावर गोळ्या झाडून खून करण्यात आला. घटनेची माहिती मिळताच गुन्हे शाखेने घटनास्थळी धाव घेत चौकशी केली. चौकशी दरम्यान, 29 ऑक्टोबर रोजी अनिल साहू याच्या घराच्या खाली मुख्य आरोपी रोहीत कोमकर याचा वाढदिवस साजरा केला जात होता. त्यावेळी रोहितचे मित्र बिल्डिंगच्या पार्किंगमध्ये दारु पिऊन धिंगाणा करत होते. त्यावेळी अनिल साहु याची रेकॉर्डवरील गुन्हेगार नवनाथ लोधा व त्याचे मित्र रोहित कोमकर व गणेश यांच्या सोबत भांडण झाल्याची माहिती पोलिसांना मिळली. पोलिसांनी परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासले असता आरोपी सिंहगड गॅरेज चौकातून वेगासेन्टरच्या दिशेने जाताना दिसले. (Pune Police Crime Branch)

मिळालेल्या माहितीच्या आधारे पोलीस आरोपींचा शोध घेत असताना पोलीस हवालदार थोरात यांना माहिती मिळाली की, गुन्ह्यातील आरोपी रोहित कोमकर हा स्वारगेट पी.एम.टी डेपो समोर उभा आहे. त्यानुसार पोलिसांनी सापळा रचून रोहित याला अटक केली. तर गणेश शिंदे याला धनकवडी येथील सार्वजनिक रोडवरुन ताब्यात घेतले. तसेच अमन परदेशी याला त्याच्या राहत्या घरातून ताब्यात घेतले.

आरोपी रोहित कोमकर व गणेश शिंदे यांच्याकडे चौकशी केली असता, फरार आरोपी नवनाथ लोधा याने दोन दिवसांपूर्वी
अनिल साहु याला पाच हजार रुपये मागितले होते. मात्र, त्याने पैसे देण्यास नकार दिला.
याचा राग मनात धरुन रविवारी मध्यरात्री दोनच्या सुमारास लोधा हा अनिल याच्या घरी गेला.
त्याठिकाणी अनिल याला शिवीगाळ करुन झटापट केली. त्यावेळी अनिल याने त्याला विरोध केला.
याचा राग आल्याने नवनाथ लोधा याने अनिलच्या कपाळावर बंदुकीतून गोळी झाडून खून केला.
गुन्ह्यातील मुख्य आरोपी फरार असून त्याच्याकडून खानाचे कारण स्पष्ट होईल असे पोलिसांकडून सांगण्यात येत आहे.

ही कामगिरी पोलीस आयुक्त रितेश कुमार, सह पोलीस आयुक्त संदिप कर्णिक,
अपर पोलीस आयुक्त गुन्हे रामनाथ पोकळे,
पोलीस उपायुक्त गुन्हे अमोल झेंडे, सहायक पोलीस आयुक्त गुन्हे-1 सुनिल तांबे यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखा
युनिट एकचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक शब्बीर सय्यद, सहायक पोलीस निरीक्षक आशिष कवठेकर,
पोलीस अंमलदार राहुल मखरे, अजय थोरात, अनिकेत बाबर, आय्याज दड्डीकर, दत्ता सोनवणे व शशीकांत दरेकर
यांच्या पथकाने केली.

Related Posts