IMPIMP

Pune Crime | बनावट पदवी प्रमाणपत्रे देऊन MIT ला घातला 57 लाखांना गंडा; कानपूर विद्यापीठाच्या नावाने दिली पदवी प्रमापत्रे, 280 विद्यार्थ्यांची फसवणूक

by nagesh
Pune Crime | Forged documents for bail of accused in murder of senior police officer's son; Fraud of court

पुणे : सरकारसत्ता ऑनलाइन माईर्स एमआयटी युनिव्हिर्सिटीच्या (Myers MIT University) स्कुल ऑफ टेलिकॉम मॅनेजमेंट (School of Telecom Management) येथे शिकणार्‍या विद्यार्थ्यांना दूरस्थ शिक्षण पद्धतीनुसार (Distance Learning Method) पदवी देत असल्याचे भासवून (Pune Crime) त्यांना कानपूरमधील (Kanpur) श्री छत्रपती शाहुजी महाराज विद्यापीठाची (Shri Chhatrapati Shahuji Maharaj Vidyapeeth) खोटी व बनावट पदवी प्रमाणपत्रे (Fake Degree Certificates) व गुणपत्रके दिल्याचा धक्कादायक प्रकार (Pune Crime) समोर आला आहे. हा प्रकार २०१४ ते २०१८ दरम्यान घडला असून तो आता तब्बल ८ वर्षांनी उघडकीस आला आहे. यामध्ये २८० विद्यार्थ्यांची फी पोटी ५८ लाख १७ हजार रुपयांची फसवणूक (Fraud) झाली आहे.

 

 

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

 

 

याप्रकरणी एमआयटीचे (MIT) विभागप्रमुख जयदिप गुलाबराव जाधव Jaideep Gulabrao Jadhav (वय ४३) यांनी कोथरुड पोलीस ठाण्यात (Kothrud Police Station) फिर्याद दिली आहे. त्यानुसार महेश रमेश देशपांडे Mahesh Ramesh Deshpande (रा. कोथरुड), स्वप्निल संजय ठाकरे (Swapnil Sanjay Thackeray) आणि माधव पाटील (Madhav Patil) (दोघे रा. नागपूर – Nagpur) यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल (FIR) करण्यात आला आहे.

 

याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कोथरुड (Kothrud) येथील एमआयटीच्या कॅम्पसमध्ये स्कुल ऑफ टेलिकॉम मॅनेजमेंट ही संस्था आहे. या संस्थेकडे स्वप्निल ठाकरे व माधव पाटील यांनी संपर्क साधून त्यांना आम्ही कानपूरमधील श्री छत्रपती शाहुजी महाराज विद्यापीठाशी संलग्न असून त्यांचा दूरस्थ शिक्षणानुसार पदवी अभ्यासक्रम चालवू असे सांगितले. त्यानुसार या ऐच्छिक कोर्ससाठी विद्यार्थ्यांनी नावनोंदणी केली. त्याची फी त्यांच्याकडे भरली. महेश देशपांडे हे समन्वयक म्हणून काम पहात होते. संस्थेने विद्यार्थ्यांची परीक्षा घेऊन त्यांचे अहवाल ठाकरे, पाटील यांच्याकडे पाठविले. त्यानुसार त्यांनी छत्रपती शाहुजी महाराज विद्यापीठाशी कोणताही संबंध नसताना कानपूर विद्यापीठाच्या नावाने बनावट पदवी प्रमाणपत्रे व गुणपत्रके तयार केली. ती संस्थेला पाठवून विद्यार्थ्यांना देण्यास भाग पाडले. (Pune Crime)

 

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

 

एमआयटीला २०१७ मध्ये अभिमत विद्यापीठाचा दर्जा मिळाल्यानंतर विद्यापीठातर्फे हा दूरस्थ कोर्स सुरु करण्याचा विचार सुरु झाला.
त्यावेळी तपासणी केल्यावर फसवणूकीचा हा प्रकार समोर आला.
त्यानंतर एमआयटीने अंतर्गत चौकशी समिती स्थापन करुन चौकशी केली.
त्यानंतर आता पोलीस ठाण्यात फिर्याद देण्यात आली आहे.

 

या संपूर्ण प्रकरणात २८० विद्यार्थ्यांचे नुकसान झाले असून त्यांची फी पोटी ५८ लाख १७ हजार रुपयांची फसवणूक झाली आहे.

 

Web Title :- Pune Crime | fraud of Rs 57 lakh by issuing fake degree certificates; Shri Chhatrapati Shahuji Maharaj Vidyapeeth Cheating with Myers MIT University 280 students

 

हे देखील वाचा :

IT Raid On Yashwant Jadhav | NCP च्या मलिकांनंतर आता शिवसेनेवर निशाणा ! मुंबई महापालिकेचे स्थायी समिती अध्यक्ष यशवंत जाधव यांच्यावर ‘आयकर’चा छापा, 5 ठिकाणी ‘रेड’

Nandurbar Police | अपघातात मृत्यू झालेल्या पोलिसाच्या कुटुंबाला नंदुरबार पोलिसांकडून 6.5 लाखाची मदत, 11 लाख 46 हजार 948 रुपयांचे जप्त केलेले 110 मोबाईल मूळ मालकांना IG बी.जी. शेखर पाटील यांच्याहस्ते सुपुर्द

Nandurbar Police | ‘आपले पोलीस’ योजनेंतर्गत नंदुरबार पोलीस दलाला 4 नवीन वाहने, IG बी.जी. शेखर पाटील यांनी दाखविला हिरवा झेंडा

Pimpri Corona Update | पिंपरी चिंचवडमध्ये गेल्या 24 तासात ‘कोरोना’च्या 60 रुग्णांचे निदान, जाणून घ्या इतर आकडेवारी

Urfi Javed Hot Viral Video | सेक्सी बिकिनी घालून स्विमिंग पूल मधून बाहेर आली उर्फी जावेद, कॅमेरा पाहताच सुरू केला डान्स..!

Anti Corruption Bureau (ACB) Pune | 25 हजार रोख आणि पोलीस चौकीसाठी प्रिंटरची लाच मागणाऱ्या 2 पोलिसांवर FIR; पुणे ग्रामीण पोलिस दलात खळबळ

 

Related Posts