IMPIMP

Pune Police | फसवणूकीचा FIR दाखल करण्यासाठी एक लाख घेतले तर आरोपींच्या अटकेसाठी 5 लाखाचा ‘आवाज’, पुणे शहर पोलिस दलातील कर्मचारी निलंबीत; जाणून घ्या प्रकरण

by nagesh
Maharashtra Thane Police | Maharashtra Thane Police Seven Policeman And  Three Police Officers Are Suspended Thane Police 10 Suspended At Mumbra Police Station

पुणे : सरकारसत्ता ऑनलाइनPune Police | फसवणुकीचा (Fraud Case) गुन्हा (FIR) दाखल करण्यासाठी फिर्यादी यांच्याकडून एक लाख रुपयांची लाच (Bribe) घेणाऱ्या सिंहगड रोड पोलीस ठाण्यातील (Sinhagad Road Police Station) पोलीस हवालदार ज्ञानेश्वर दिनकर माडीवाले (Dnyaneshwar Dinkar Madiwale) यांना निलंबित (Suspended) करण्यात आले आहे. ज्ञानेश्वर माडीवाले यांच्या निलंबनाचे आदेश पोलीस उपायुक्त परिमंडळ 3 पौर्णिमा गायकवाड (DCP Purnima Gaikwad) यांनी काढले आहेत.

 

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

 

 

ज्ञानेश्वर माडीवाले यांनी 12 डिसेंबर 2021 रोजी रात्री दहाच्या सुमारास सहायक (झिरो पोलीस) मिलींद चौरे (Milind Chaure) याच्या मार्फत लाच स्विकारल्याचे (Accepting Bribe) सिद्ध झाले आहे. दरम्यान, मंगळवारी (दि.19) अवैध धंद्यांना प्रोत्साहन देऊन वसुली केल्या प्रकरणी पोलीस हवालदार श्रीधर पाटील (Shridhar Janardhan Patil) यांना निलंबित केले होते. यानंतर सलग दुसऱ्या दिवशी आणखी एका पोलीस हवालदाराला निलंबित केल्याने पोलीस दलात (Pune Police) खळबळ उडाली आहे.

 

पोलीस हवालदार ज्ञानेश्वर माडीवाले हे सिंहगड रस्ता पोलीस ठाण्यात कर्तव्य करीत आहेत. फिर्यादी यांनी फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यासाठी पोलीस आयुक्तांकडे (Pune CP) तक्रार अर्ज केला होता. त्यानुसार चौकशी (Inquiry) करण्याचे आदेश दिले होते. तक्रारदार यांनी 20 ऑक्टोबर 2021 रोजी अर्ज देऊनही जाणीवपूर्वक उशीराने 24 जानेवारी 2022 रोजी गुन्हा दाखल केला. गुन्हा दाखल करण्यासाठी माडीवाले यांनी एक लाख रुपयांच्या लाचेची मागणी करुन लाच स्विकारली. तसेच दाखल गुन्ह्यातील आरोपींना अटक करण्यासाठी पाच लाख रुपयांची मागणी केली. तक्रारदार यांनी पैसे न दिल्याने आरोपींना जामीन (Bail) घेण्याचा सल्ला माडीवाले यांनी देऊन आरोपींना जामीन मिळण्यासाठी मदत केली. माडीवाले यांनी कर्तव्य करीत असताना बेशिस्त व बेजबाबदारपणाचे गैरवर्तन केल्याचे आदेशात नमूद केले आहे.

 

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

 

 

ज्ञानेश्वर माडीवाले यांनी महाराष्ट्र नागरी सेवा कायद्यातील (Maharashtra Civil Service Act) नियमांचे उल्लंघन (Violation of Rules) केले आहे.
त्यामुळे पुणे पोलीस खात्याची प्रतिमा मलीन झाली आहे.
निलंबन कालावधीत खासगी नोकरी किंवा व्यवसाय करता येणार नाही.
तसेच मुख्यालय (Police Headquarter) सोडता येणार नाही.
मुख्यालय सोडायचे असेल तर पोलीस उपायुक्त मुख्यालय पुणे यांना अगोदर माहिती देऊन त्यांची परवानगी घेणे आवश्यक आहे.
निलंबन कालावधीत दररोज राखीव पोलीस निरीक्षक (Police Inspector) यांच्याकडे हजेरी द्यावी लागेल,
असे आदेशात नमूद करण्यात आले आहे.

 

Web Title :- Pune Police | 1 lakh for filing FIR for fraud and demand of 5 lakh for arrest of accused Pune city police personnel suspended Know the case

 

हे देखील वाचा :

Kidney Cure | किडनी डिटॉक्स करतात ‘हे’ 3 ड्रिंक, जाणून घ्या बनवण्याची पद्धत

MNS On Dhananjay Munde | राज ठाकरेंना ‘अर्धवटराव’ म्हणणार्‍या धनंजय मुंडेंना मनसेनं दिलं उत्तर, म्हणाले – ‘तुमच्या सारख्या तात्या विंचूचा…’

Menstrual Ayurvedic Treatment | मासिक पाळीच्या वेदनांमधून सुटका मिळवण्यासाठी जाणून घ्या आयुर्वेदिक उपाय

 

Related Posts