IMPIMP

Pune Crime | SBI मध्ये नोकरीचे आमिष दाखवून महिलेला 17 लाखांचा गंडा

by nagesh
Pune Crime News | Fraud of youth on official toll free number of finance company; 7.5 lakhs cheated by asking to generate a new credit card PIN

पुणे : सरकारसत्ता ऑनलाइन – Pune Crime | स्टेट बँकेत पी ओ (SBI PO) पदावर नोकरी लावून देतो (Lure Of Job), असे सांगून दोघांनी बनावट नियुक्तीपत्र देऊन तब्बल 17 लाख रुपयांना गंडा (Cheating Case) घातल्याचा प्रकार समोर आला आहे. (Pune Crime)

 

याप्रकरणी खराडी येथील एका 32 वर्षाच्या महिलेने विमानतळ पोलीस ठाण्यात (Viman Nagar Police Station) फिर्याद (गु. रजि. नं. 265/22) दिली आहे. त्यावरुन तुकाराम पाटील व अमित शेट्टे मोन यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे़ हा प्रकार 13 मार्च 2020 पासून आजपर्यत घडला. (Pune Crime)

 

याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांच्या चुलत दीराच्या ओळखीने तुकाराम पाटील व अमित शेट्टे यांच्याशी ओळख झाली होती. त्यांनी फिर्यादी यांना स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये पी ओ पदावर नोकरी लावून देतो, असे आमिष दाखविले. पी ओ या पदासाठी नियुक्ती झाल्याबाबत बनावट नियुक्ती पत्र तयार केले. ते फिर्यादी यांना त्यांचे ई मेलवर पाठवून फिर्यादी यांचा विश्वास संपादन केला. फिर्यादी यांच्याकडून 17 लाख रुपये घेतले. त्यांना कोणत्याही प्रकारची नोकरी दिली नाही. आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यावर त्यांनी पोलिसांकडे तक्रार दिली असून पोलीस उपनिरीक्षक ढावरे तपास करीत आहेत.

 

Web Title :- Pune Crime | Lure OF JOB In SBI 17 Lakhs Cheating Fraud Case

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

हे देखील वाचा :

 

 

Related Posts