IMPIMP

Pune Crime News | बिटकॉईनच्या आमिषाने 20 लाखाची फसवणूक; टोळीच्या म्होरक्यास अटक ! 7 मोबाईल, 10 सिम कार्ड, बँकांचे 18 खात्यांचे पासबुक, 8 डेबिटकार्ड जप्त

by nagesh
Pune Crime News | 20 lakh scam with Bitcoin bait; Gang leader arrested! 7 mobiles, 10 SIM cards, 18 account passbooks of banks, 8 debit cards seized

पुणे : सरकारसत्ता ऑनलाईन-  Pune Crime News | बिटकॉईन देण्याचे आमिष दाखवून तब्बल 19 लाख 70 हजार 866 रूपये बँक खात्यावर भरण्यास भाग पाडून नंतर बिटकॉईन (Lure Of Bitcoin) न देता फसवणूक (Cheating Case) करणार्‍या टोळीच्या म्होरक्याच्या शिवाजीनगर पोलिसांनी (Shivaji Nagar Police) मुसक्या आवळल्या आहेत. त्याला रायगड (Raigad) जिल्हयातील कर्जत (Karjat) तालुक्यातील दहीवली (Dahiwali) येथून अटक करण्यात आली असून त्याच्या ताब्यातून 7 मोबाईल, 10 सिम कार्ड, वेगवेगळया बँकांचे 18 खात्यांचे पासबुक, वेगवेगळया बँकाचे 8 डेबिटकार्ड आणि एक क्यु.आर. कोड जप्त करण्यात आला आहे. (Pune Crime News)

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

याबाबत अधिक माहिती अशी की, शनिवार पेठेत राहणार्‍या 36 वर्षीय व्यक्तीचे कार्यालय शिवाजीनगर येथे आहे. त्यांच्याच ऑफिसमधील आरोपी मुकुलच्या (रा. मुंबई) टोळीतील दोघे त्यांना भेटले. त्यांनी त्यांचा विश्वास संपादन केला. 3 बिटकॉईन देतो असे सांगुन आरोपींपैकी एकाने त्याच्या बँक खात्यावर त्यांच्याकडून 19 लाख 70 हजार 866 रूपये भरून घेतले. त्यानंतर बिटकॉईनची मागणी केल्यानंतर आरोपींनी त्यांना बिटकॉईन न देता जीवे मारण्याची धमकी दिली. फसवणूक झाल्यचे लक्षात आल्यानंतर तक्रारदाराने मार्च 2022 मध्ये शिवाजीनगर पोलिस ठाण्यात (Shivaji Nagar Police Station) गुन्हा दाखल केला. (Pune Crime News)

 

पोलिसांनी प्रियेश अनिल राव उर्फ शेट्टी उर्फ मुकुल (34, रा. डी/14, द मिस्ट, इंदिरानगर, दहीवली, ता. कर्जत, जि. रायगड), रंजित जरनैल सिंग (37, रा. हेमिटेज शंगनिला, वेस्टर्न एक्सप्रेस हायवे, मीरा रोड, जि. रायगड), शब्बीर शेख (रा. निर्मलनगर, सनथॉमस चर्च, मीरा रोड), सुजय पॉल (रा. हांडेवाडी रोड, पुणे) आणि मंगेश कदम (रा. स्नेह सागर सोसायटी, गोखलेनगर) यांच्याविरूध्द गुन्हा दाखल केला. सदरील गुन्हयामध्ये मुकुल हा बिटकॉईन विक्री करण्याच्या व्यवहारामध्ये प्रमुख सुत्रधार असून तो नाव व मोबाईल बदलून तसेच राहण्याचे ठिकाण वेळोवेळी बदलत होता.

आरोपीचा कुठलाही सुगावा नसताना पोलिस अमंलदार आदेश चलवादी (Adesh Chalwadi) यांनी आरोपीचे छायाचित्र मिळवले. त्यानंतर वरिष्ठ पोलिस निरीक्षक अरविंद माने (Sr PI Arvind Mane) यांनी तात्काळ सायबर पथकातील API बाजीराव नाईक (API Bajirao Naik) आणि रूपेश वाघमारे (Rupesh Waghmare) आणि आदेश चलवादी यांचे पथक आरोपीच्या शोधासाठी रवाना केले. पोलिस पथकाने शुक्रवारी (दि. 6) रायगड जिल्हयातील कर्जत तालुक्यातील दहीवली येथून आरोपी प्रियेश अनिल राव उर्फ शेट्टी उर्फ मुकुल याला अटक केली. त्याच्या घराची झडती घेतली असता पोलिसांना 7 मोबाईल, 10 सिम कार्ड, 18 पास बुक, 8 डेबिट कार्ड आणि एक क्यु.आर. कोड आढळून आला. पोलिसांनी मुद्देमाल जप्त केला.

अटक आरोपी मुकुल याने आणखी अशा प्रकारे बिटकॉईनचे आमिष दाखवून कोणाची फसवणूक केली आहे काय
याचा शोध शिवाजीनगर पोलिस घेत आहेत. दरम्यान, अशा प्रकारची कोणाची फसवणूक झाली असल्यास
त्यांनी शिवाजीनगर पोलिसांशी संपर्क साधावा असे आवाहन देचील करण्यात आले आहे.
सदरील गुन्हयामध्ये मुकुलचा साथीदार शब्बीर हद्रदीश शेख (41, रा. निर्मलनगर, मीरा रोड, पु.)
याला देखील अटक करण्यात आली असून इतर आरोपींचा शोध घेतला जात आहे.

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

पोलिस उपायुक्त संदीप सिंह गिल्ल (IPS Sandeep Singh Gill), सहाय्यक आयुक्त सतिश गोवकर
(ACP Satish Govekar) यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ निरीक्षक अरविंद माने,
पोलिस निरीक्षक (गुन्हे) विक्रम गौड (PI Vikram Gaud),
सायबर पथकाचे सहाय्यक पोलिस निरीक्षक बाजीराव नाईक, पोलिस अंमलदार रूपेश वाघमारे, आदेश चलवादी,
अर्जुन कुडाळकर आणि रूचिका जमदाडे यांच्या पथकाने आरोपींना अटक केली.
गुन्हयाचा पुढील तपास शिवाजीनगर पोलिस करीत आहेत.

 

Web Title :- Pune Crime News | 20 lakh scam with Bitcoin bait; Gang leader arrested! 7 mobiles, 10 SIM cards, 18 account passbooks of banks, 8 debit cards seized

 

हे देखील वाचा :

Ratan Raajputh | ‘या’ कारणामुळे टीव्ही-युट्युबवरुन गायब होती अभिनेत्री रतन रजपूत; केला मोठा खुलासा

IND VS SL | तिसऱ्या T-20 सामन्यात कोण मारणार बाजी? कधी, कुठे पहाल सामना?

Apurva Nemlekar | अपूर्वासाठी केलेल्या बॅनरबाजीचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल; ‘भरघोस मतदान करून…’

 

Related Posts