IMPIMP

Pune Crime News | पार्ट टाईम नोकरीच्या अमिषाने दोघांची 32 लाखांची फसवणूक; विश्रांतवाडी, हडपसर पोलीस ठाण्यात FIR

by sachinsitapure
Pune Crime News | 32 lakh fraud of two with the lure of part-time job; FIR in Vishrantwadi, Hadapsar Police Station

पुणे : सरकारसत्ता ऑनलाईन – Pune Crime News | पार्ट टाईम नोकरी (Part Time Job) देण्याचे आमिष दाखवून एका महिलेची आणि एका युवकाची आर्थिक फसवणूक (Financial Fraud) केल्याचा प्रकार पुण्यात उघडकीस आला आहे. (Pune Crime News) याप्रकरणी महिलेने विश्रांतवाडी पोलीस ठाण्यात (Vishrantwadi Police Station) तर युवकाने हडपसर पोलीस ठाण्यात (Hadapsar Police Station) तक्रार दिली आहे. सायबर गुन्हेगारांनी दोघांची लाखो रुपयांची आर्थिक फसवणूक केली आहे.

Join Our SarkarsattaWhatsapp GroupTelegram GroupFacebook Page for every Update

विश्रांतवडी पोलीस ठाण्यात 24 वर्षाच्या महिने दिलेल्या तक्रारीनुसार, फिर्यादी यांना त्यांच्या व्हॉट्सअप व मेसेज करुन
पार्ट टाईम नोकरी देण्याचे आमिष दाखवण्यात आले. त्यासाठी आरोपींनी फिर्यादी यांना विविध टास्क देऊन त्यांना पैसे
भरण्यास सांगितले. त्यानुसार फिर्यादी यांनी पैसे भरले. पैसे भरल्यानंतर फिर्यादी यांना नोकरी न देता सायबर चोरट्यांनी
फिर्यादी यांची 13 लाख 27 हजार 400 रुपयांची आर्थिक फसवणूक केली. फिर्यादी यांनी दिलेल्या तक्रारीवरुन पोलिसांनी
एका मोबाईल क्रमांक धारक तसेच टेलिग्राम युजर (Telegram User) आणि विविध बँक खातेधारक यांच्याविरोधात आयपीसी 420, 34 सह आयटी अॅक्ट (IT Act) नुसार गुन्हा (FIR) दाखल केला आहे. पुढील तपास पोलीस करीत आहेत. (Pune Crime News)

युवकाची 18 लाखांची फसवणूक

हडपसर पोलीस ठाण्यात 39 वर्षाच्या व्यक्तीने दिलेल्या तक्रारीनुसार, सायबर चोरट्यांनी फिर्यादी यांचा विश्वास
संपादन करुन पार्ट टाईम नोकरी देण्याचे आमिष दाखवले. त्यासाठी फिर्यादी यांना विविध टास्क पूर्ण करण्यास सांगितले.
त्यानुसार फिर्यादी यांनी आरोपींनी सांगितल्या प्रमाणे टास्क पूर्ण केले. तसेच त्यांना विविध बँक खात्यात 18 लाख 70 हजार
200 रुपये भरण्यास सांगून त्यांची आर्थिक फसवणूक केली. फिर्यादी यांनी दिलेल्या तक्रार अर्जाची चौकशी करुन पोलिसांनी आरोपींविरुद्ध आयपीसी 419, 420, 34 सह आयटी अॅक्ट नुसार गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास पोलीस करीत आहेत.

 

Related Posts