IMPIMP

Pune Crime News | ‘झूमकार’ ॲपवरुन भाड्याने नेलेली कार परत आणून न देता फसवणूक, एकावर FIR

by sachinsitapure
Pune Crime News | FIR against man for not returning car rented from 'Zoomcar' app

पुणे : सरकारसत्ता ऑनलाईन – Pune Crime News | ‘झूमकार’ ॲपवरुन (Zoomcar App) आपली कार भाड्याने देणे एका कार मालकाला चांगलेच महागात पडले आहे. काही दिवसांसाठी कार घेऊन गेलेल्या व्यक्तीने कार परत न देता कार मालकाची 11 लाख 50 हजार रुपयांची आर्थिक फसवणूक (Cheating Case) केली. याबाबत कार मालकाने विश्रांतवाडी पोलीस ठाण्यात (Vishrantwadi Police Station) तक्रार केली आहे. हा प्रकार (Pune Crime News) 20 जुलै ते 20 ऑगस्ट 2023 दरम्यान टिंगरेनगर विश्रांतवाडी येथे घडला आहे.

Join Our SarkarsattaWhatsapp GroupTelegram GroupFacebook Page for every Update

याबाबत शहाजी पाटील Shahaji Patil (वय-25) यांनी विश्रांतवाडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
याप्रकरणी अविनाश रंगराव मामलेकर Avinash Rangrao Mawekar (रा. मुंबई) याच्या विरुद्ध आयपीसी 420, 406 नुसार गुन्हा (FIR) दाखल केला आहे. (Pune Crime News) आरोपी अविनाश मामलेकर याने झूमकार या अॅपच्या माध्यमातून कार मालक शहाजी पाटील यांच्याशी संपर्क करुन त्यांचा विश्वास संपादन केला. वैयक्तीक वापरासाठी कार पाहिजे असल्याचे सांगून करारनामा केला.

फिर्यादी यांनी त्यांची ह्युंदाई Hyundai (एमएच 25 ए.एस 3609) कार विश्वासाने आरोपीकडे सोपवली.
मुदत संपल्यानंतर आरोपीने कार कंपनीला परत न करता अपहार केला. आरोपीने गाडीचा वापर अवैध व्यवसायासाठी मुंबई,
दमण येथे जाऊन केला. अखेर आरोपी अविनाश मामलेकर याने आपली फसवणूक केली असल्याचे लक्षात आल्यानंतर
कार मालकांनी विश्रांतवाडी पोलीस ठाण्यात तक्रार केली. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक चव्हाण (PSI Chavan) करीत आहेत.

Related Posts