IMPIMP

Pune Crime News | संकष्टी चतुर्थीला ‘दगडुशेठ’जवळ ‘वसुली’चा प्रयत्न करणारा पोलीस कर्मचारी निलंबित

by nagesh
Pune Crime News | A policeman who attempted 'recovery' near 'Dagdusheth' on Sankashti Chaturthi has been suspended

पुणे : सरकारसत्ता ऑनलाईन  – Pune Crime News | गणेश चतुर्थीला (Ganesh Chaturthi) शिवाजी रोडवर श्रीमंत दगडुशेठ हलवाई
गणपतीच्या (Dagdusheth Halwai Ganapati) दर्शनासाठी लाखो भाविक येत असतात. अशा वेळी वाहतूक नियमन (Traffic Rules) करण्याऐवजी
वाहनचालकांना थांबवून त्यांच्याकडून वसुलीचा प्रयत्न करणार्‍या वाहतूक शाखेच्या (Pune Police Traffic Branch) कर्मचार्‍याला निलंबित
(Suspended) करण्यात आले. (Pune Crime News)

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

पोलीस नाईक अनिल कल्लाप्पा जामगे (Police Naik Anil Kallappa Jamge) असे निलंबित केलेल्या कर्मचार्‍याचे नाव आहे. (Pune Police News)

अनिल जामगे हे फरासखाना वाहतूक शाखेत (Faraskhana Traffic Branch) कार्यरत होते. ११ मार्च रोजी गणेश चतुर्थीच्या दिवशी जामगे यांची शिवाजी रोडवरील बुधवार चौकात नेमणूक होती. दोघे जण दुचाकीवर सायंकाळी ७ वाजता बुधवार चौकातील सिग्नलला थांबले होते. त्यावेळी त्यांच्याकडील अन्य जिल्ह्यातील दुचाकी पाहून जामगे यांनी त्यांना अडविले. लायसन्सची मागणी विचारणा केली. त्यांच्याकडे लायसन्स नसल्याने विना लायसन्स (Driving License) वाहन चालविण्याकरीता ५ हजार रुपये दंड असल्याचे सांगितले. गाडीचे मालक दुसरे असल्याने चालक व मालक असे १० हजार रुपये दंड भरण्यास सांगितले. तक्रारदार यांना ५०० रुपये रोख आणण्यास सांगितले. (Pune Crime News)

 

तक्रारदार हे एटीएममध्ये पैसे आणण्यासाठी गेले होते. त्यांच्याकडे एटीएम नसल्याने ते परत आले.
त्यानंतर जामगे याने तक्रारदार यांची गाडी वाहतूक विभागात आणली.
स्वत:ची नेमप्लेट पाडून आपली ओळख लपविली.
यापूर्वी वरिष्ठांना व पोलीस अंमलदारांना कारवाई दरम्यान बॉडी कॅमेरे वापरण्याबाबत वेळोवेळी आदेश दिले होते.
परंतु त्याने बॉडी कॅमेरा बाळगला नाही व दिलेल्या आदेशाचे पालन केले नाही.
संकष्टी चतुर्थी असल्याने शिवाजी रोडवर मोठ्या प्रमाणावर भाविकांची गर्दी होती व त्यामुळे दगडुशेठ मंदिर
व परिसरामध्ये मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी होत होती.
अशा वेळी तक्रारदार यांची गाडी अडवून त्यांच्याशी चर्चा करण्यामध्ये विनाकारण वेळ वाया घालविला
व नेमून दिलेल्या वाहतूक नियमानाचे कर्तव्याकडे दुर्लक्ष केले.
यामुळे बेशिस्त बेजबाबदार वर्तन केल्याने अनिल जामगे यांना वाहतूक शाखेचे उपायुक्त विजयकुमार मगर
(DCP Vijayakumar Magar) यांनी निलंबित केले आहे.

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

Web Title :- Pune Crime News | A policeman who attempted ‘recovery’ near ‘Dagdusheth’ on Sankashti Chaturthi has been suspended

 

हे देखील वाचा :

Pune Crime News | स्टेट बँक ऑफ इंडियाला अ‍ॅटो लोन कॉन्सिलरनेच घातला ४७ कोटींचा गंडा; बनावट कागदपत्रे सादर करुन केली ४६ वाहन कर्ज प्रकरणे

Pune ACB Trap | अनुकूल अहवाल देण्यासाठी ४० हजारांची लाच घेणारा विधी सल्लागारासह दोघांना अटक; अशा प्रकारची पहिलीच कारवाई

Pune – Navale Bridge Accident | नवले ब्रिजजवळील वडगाव पुल परिसरात भीषण अपघात, पोलिसांच्या गाडीसह 10 वाहनांना धडक

 

Related Posts