IMPIMP

Pune Crime News | पत्नीला आत्महत्येस प्रवृत्त केल्याच्या आरोपातून पतीची निर्दोष मुक्तता

by nagesh
Pune Crime News | Acquittal of husband for abetting wife’s suicide Pune Police Shivaji Nagar Court

पुणे : सरकारसत्ता ऑनलाईन – Pune Crime News | पत्नीला मारहाण करुन तिला आत्महत्येस (Suicide Case) प्रवृत्त केल्याच्या गुन्ह्यातून पतीची निर्दोष मुक्तता (Acquittal of Husband) करण्यात आली. अतिरिक्त जिल्हा न्यायाधीश अजित मरे (Additional District Judge Ajit Murray) यांनी निकाल दिला आहे. अशी माहिती आरोपीचे वकील अ‍ॅड. सचिन झालटे पाटील (Adv. Sachin Zalte Patil) यांनी दिली. याप्रकरणी वाकड पोलीस ठाण्यात (Wakad Police Station) जुलै 2018 मध्ये आरोपी पंकज रतन पाचपिंडे (Pankaj Ratan Pachpinde) व उषा रुपचंद काळोखे (Usha Rupchand Kalokhe) यांच्या विरोधात आयपीसी 306 व 498 अ नुसार गुन्हा दाखल केला होता. (Pune Crime News)

प्रतिक्षा पाचपिंडे (Pratiksha Pachpinde) असे आत्महत्या केलेल्या विवाहीत महिलेचे नाव आहे. फिर्यादी यांच्या म्हणण्यानुसार, आरोपी पंकज पाचपिंडे याचे एका महिलेशी अनैतिक संबंध (Immoral Relationship) होते. यामुळे पंकज पत्नी प्रतिक्षा हिचा शारीरिक व मानसिक छळ करत होता. या त्रासाला कंटाळून प्रतिक्षाने गळफास घेऊन आत्महत्या केली. आरोपी पंकज आणि उषा यांच्यात प्रेमसंबंध असल्याकारणाने प्रतिक्षाने आत्महत्या केल्याचे फिर्यादीत नमूद केले. (Pune Crime News)

या प्रकरणात आरोप सिद्ध करण्यासाठी पाच साक्षीदार सरकार पक्षाने तपासले.
तर आरोपींच्या वतीने अ‍ॅड. सचिन झालटे पाटील व अ‍ॅड. अजित गंडाळ (Adv. Ajit Gandal)
यांनी बाजू मांडली. आरोपींच्या वकीलांना कोर्टात बाजू मांडताना महत्त्वाचे मुद्दे सादर केले.
या प्रकरणात साक्षीदारांच्या जाबाबामध्ये तफावत आहे.
तसेच आरोपीने मयत प्रतिक्षा हिला मारहाण केल्याचे पुरावा नाही.
आरोपींच्या वकीलांचा युक्तिवाद ग्राह्य धरुन अतिरिक्त जिल्हा न्यायाधीश अजित मरे यांनी आरोपींची गुन्ह्यातून निर्दोष मुक्तता केली.

Web Title : Pune Crime News | Acquittal of husband for abetting wife’s suicide Pune Police Shivaji Nagar Court

Related Posts