IMPIMP

Pune Crime News | महिला पोलीस अधिकार्‍यांवर पोलीस चौकीच्या दारातच हल्ला; फोर्स वनच्या पोलीस कर्मचार्‍यावर गुन्हा

by sachinsitapure
Molestation Case

पुणे : सरकारसत्ता ऑनलाईन – Pune Crime News | विनयभंगाची (Molestation Case) तक्रार मागे घेतल्यानंतरही त्रास देणार्‍या पोलीस कर्मचार्‍याची (Police Officer) तक्रार देण्यासाठी सिंहगड रोडवरील अभिरुची पोलीस चौकीत (Abhiruchi Police Chowk) महिला पोलीस अधिकारी (Women Police Officer) गेल्या होत्या. तेव्हा या चौकीच्या दारातच त्यांच्यावर पोलीस कर्मचार्‍याने हल्ला केल्याचा प्रकार समोर आला आहे. (Pune Crime News)

Join Our SarkarsattaWhatsapp GroupTelegram GroupFacebook Page for every Update

सिंहगड रोड पोलिसांनी (Pune Police) निलेश आंद्रेस भालेराव Nilesh Andres Bhalerao (रा. कोले कल्याण पोलीस वसाहत, कलिना, सांताक्रुझ, मुंबई) याला अटक केली आहे. याबाबत एका महिला पोलीस निरीक्षकांनी (Female PI) सिंहगड रोड पोलीस ठाण्यात (Sinhagad Road Police Station) फिर्याद (गु. रजि. नं. ४१७/२३) दिली आहे. हा प्रकार सिंहगड रोडवरील अभिरुची पोलीस चौकीच्या दारात रविवारी दुपारी पावणे तीन वाजता घडला. (Pune Crime News)

याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी निलेश भालेराव हा मुंबईत फोर्स वन येथे नेमणूकीला आहे.
फिर्यादी या एमआयए येथे २०१८ मध्ये नेमणुकीला असताना आरोपी निलेश हा फोर्स वनचे ट्रेनिंगसाठी आला होता. यावेळी त्याने फिर्यादी यांच्या शासकीय कर्तव्यात अडथळा आणून त्यांच्यावर हल्ला करुन विनयभंग केला होता. त्यांनी आरोपीविरुद्ध वानवडी पोलीस ठाण्यात (Wanwadi Police Station) गुन्हा दाखल केला होता. त्यानंतर आरोपीच्या घरच्यांच्या विनंतीवरुन फिर्यादी यांनी तो गुन्हा मागे घेतला होता. गुन्हा मागे घेतल्यानंतरही निलेश भालेराव हा त्यांना वारंवार मोबाईलवर फोन करुन त्रास देत होता. त्याच्याविरुद्ध तक्रार देण्यासाठी या महिला अधिकारी अभिरुची पोलीस चौकीत गेल्या होत्या. पोलिसांनी अदखलपात्र तक्रार घेतल्यानंतर त्या पतीसमवेत घरी जाण्यास निघाल्या.

तेव्हा निलेश तेथे आला. त्याने हे काही बरोबर केले नाही, माझा त्रास तुम्ही आणखीन वाढवला, असे मोठ्या ने बोलून
फिर्यादी या चौकीच्या बाहेर जात असताना त्यांच्यावर हल्ला केला. पायर्‍यांवर दरवाजा लगत ढकलून त्यांचा विनयभंग केला.
त्यांना अश्लिल शिवीगाळ केली. पोलीस चौकीतील पोलिसांनी तातडीने निलेश भालेराव याला पकडले.
सहायक पोलीस निरीक्षक चंदनशिव (API Chandanashiv) तपास करीत आहेत.

Related Posts