IMPIMP

Pune Police News | पोलीस दलात खळबळ! पुण्यातील पोलिस कर्मचार्‍यानं खून प्रकरणाचा व्हिडीओ असल्याचं सांगून मागितली 15 लाखांची खंडणी, जाणून घ्या प्रकरण

by sachinsitapure

पुणे / दौंड : सरकारसत्ता ऑनलाईन – Pune Police News | दौंड तालुक्यातील वरवंड येथील सुरेश गांधी (Suresh Gandhi Murder Case) या ज्येष्ठ नागरिकाचा वन विभागाच्या हद्दीत गळा दाबून खून करतानाचा व्हिडीओ आपल्याकडे आहे. हे प्रकरण कोणाला न सांगण्यासाठी मला 15 लाख रुपये द्या, अशी मागणी करणाऱ्या पुणे शहर पोलीस दलात (Pune Police News) असलेल्या पोलिसावर यवत पोलीस ठाण्यात (Yawat Police Station) गुन्हा (FIR) दाखल करण्यात आला आहे.

Join Our SarkarsattaWhatsapp GroupTelegram GroupFacebook Page for every Update

सागर गोविंद शिंदे Sagar Govind Shinde (रा. वरवंड) असे गुन्हा दाखल करण्यात आलेल्या पोलिसाचे (Pune Police News) नाव आहे. सागर शिंदे हा विश्रामबाग पोलीस ठाण्यातील (Vishrambaug Police Station) कर्मचारी आहे. तो मागील सहा महिन्यापासून गैरहजर आहे. गुन्हा दाखल झाल्यानंतर शिंदे याने अटकपूर्व जामीनासाठी अर्ज (Anticipatory Bail) केला होता. मात्र, न्यायालयाने त्याचा अटकपूर्व जामीनाचा अर्ज फेटाळून लावला आहे. सुरेश गांधी खून प्रकरणात पोलिसाने खंडणी (Extortion) मागितल्याचा प्रकार समोर आल्याने पोलीस दलात खळबळ उडाली असून या प्रकरणाला आता वेगळे वळण लागले आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, 27 मार्च 2022 रोजी वरवंड येथील राहुल भंडारी (Rahul Bhandari) यांचे सासरे
सुरेश गंधी यांचा गळा आवळून वन विभागाच्या जागेत खून करण्यात आला होता. हा खून करतानाचा व्हिडीओ माझ्याकडे असून या प्रकरणात तुमच्या घरातील सर्वांना अडकवू शकतो. असे सांगत सागर शिंदे याने 15 लाख रुपयांची मागणी आरोपी राकेश भंडारी याच्याकडे केली.

दरम्यान, सागर शिंदे याने आरोपी राकेश भंडारी याच्याकडून यापूर्वी आठ लाख रुपये घेतले आहेत.
त्यामुळे राहुल भंडारी यांनी यवत पोलीस ठाण्यात सागर शिंदे याच्या विरोधात तक्रार दिली.
या तक्रारीवरुन यवत पोलिसांनी सागर शिंदे याच्यावर गुन्हा दाखल केला आहे.
पुढील तपास पोलीस निरीक्षक हेमंत शेडगे (PI Hemant Shedge) यांच्या मार्गदर्शनाखाली
सहायक पोलीस निरीक्षक केशव वाबळे (API Keshav Wable) करीत आहेत.

Related Posts