IMPIMP

Pune Crime News | पुणे क्राईम न्यूज : हडपसर पोलिस स्टेशन – मोबाईल पाहिल्याने पत्नीला मारहाण करुन केला छळ

by nagesh
Pune Crime News | Hadapsar Police Station - Wife was beaten and tortured for looking at her mobile phone

पुणे : सरकारसत्ता ऑनलाईन – Pune Crime News | नातेवाईक, पतीपत्नीपासून काही गोष्ट लपवून ठेवायचा असेल तर अनेक जण आपल्या मोबाईलला दुसर्‍याला हात लावून देत नाही, पत्नीने मोबाईल पाहिला, या कारणावरुन पतीने तिला शिवीगाळ करुन मारहाण (Beating) केल्याचा, मानसिक, शारीरीक छळ करुन नांदविण्यास नकार दिल्याचा प्रकार समोर आला आहे. (Pune Crime News)

याबाबत एका २६ वर्षाच्या महिलेने हडपसर पोलीस स्टेशनमध्ये (Hadapsar Police Station) फिर्याद (गु. रजि. नं. ७४२/२३) दिली आहे. त्यानुसार पोलिसांनी शशिकांत श्रीमंत गायकवाड Shashikant Shrimant Gaikwad (वय ३५), सासरे श्रींमत कोंडिबा गायकवाड Shrimat Kondiba Gaikwad (वय ६०, रा. रामपूर, ता. अक्कलकोट, जि. सोलापूर – Akkalkot, Solapur) यांच्यावर गुन्हा First Information Report (FIR) दाखल केला आहे. हा प्रकार मांजरी तसेच रामपूर येथे २०२० पासून एप्रिल २०२३ पर्यंत सुरु होता. (Pune Crime News)

याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांचा शशिकांत गायकवाड याच्याशी विवाह झाला.
विवाहानंतर एक दिवशी त्यांनी पतीचा मोबाईल पाहिला. त्यातील काही बाबींविषयी त्यांनी विचारणा केली.
त्यावरुन शशिकांत याने माझ्या मोबाईलला हात का लावला, असे म्हणून त्यांना शिवीगाळ करुन मारहाण केली.
त्यानंतर किरकोळ कारणावरुन त्यांचा शारीरीक व मानसिक छळ करण्यास सुरुवात केली. त्यांना माहेरी आणून सोडले.
परत नांदविण्यास नकार दिला. सासरे श्रीमंत गायकवाड यांनी लग्नातील साहित्य घेऊन जाण्यास नकार देऊन
त्यांना शिवीगाळ करुन धक्काबुक्की केली. पोलीस नाईक जोगदंड तपास करीत आहेत.

Join Our SarkarsattaWhatsapp GroupTelegram GroupFacebook Page for every Update


Web Title :
Pune Crime News | Hadapsar Police Station – Wife was beaten and tortured for looking at her mobile phone

हे देखील वाचा

Related Posts