IMPIMP

Maharashtra Politics News | ‘अजितदादा… दंगलीचा मास्टरमाईंड तुमच्या समोर बसलेला’, भाजप आमदाराचा खळबळजनक आरोप (व्हिडिओ)

by nagesh
Maharashtra Politics News | nitesh rane says uddhav thackeray is behind maharashtra riots

मुंबई : सरकारसत्ता ऑनलाईन – Maharashtra Politics News | मागील काही महिन्यांमध्ये राज्यात लहान-मोठ्या दंगली उसळल्या आहेत. राम नवमीच्या दिवशी राज्यात तीन ते चार ठिकाणी दगडफेक आणि जाळपोळ करण्यात आली होती. त्यानंतर दोन दिवसांपूर्वी मध्यरात्री अकोला (Akola Riots) शहरात दोन गटांमध्ये राडा झाला. या राड्याचे रुपांतर दंगलीत झाले. यानंतर शेगाव शहरात (Shegaon Riots) छत्रपती संभाजी महाराजांच्या जयंतीनिमित्त (Chhatrapati Sambhaji Maharaj) रात्री निघालेल्या मिरवणुकीदरम्यान दोन समाजात आक्षेपार्ह घोषणांमुळे राडा झाला. तसेच दगडफेक आणि जाळपोळ करण्यात आली. या सर्व (Maharashtra Politics News) घटनांवरून विरोधक आणि सत्तधारी यांच्यात आरोप प्रत्यारोप सुरु झाले आहेत.

राज्याचे विरोधी पक्षनेते अजित पवार (Ajit Pawar) यांनी या दंगलीप्रकरणी कारवाई करण्याची मागणी केली आहे. तर आज भाजप आमदार नितेश राणे (BJP MLA Nitesh Rane) यांनी पत्रकार परिषद घेऊन दंगलीवरुन गंभीर आरोप केले आहेत. राणे म्हणाले, काल विरोधी पक्षनेते अजित दादांनी सांगितलं, या दंगलीचा मास्टर माइंड (Mastermind) शोधा. मी दादांना सांगेन या दंगली होतायत त्याचा मास्टरमाईंड शरद पवार (Sharad Pawar) यांचे निवासस्थान असलेल्या सिल्व्हर ओकवर काही दिवसांपूर्वी आला होता. (Maharashtra Politics News) तुमच्यासोबत बसलेला होता. पवार साहेबांच्या बाजूच्या सोफ्यावर बसलेला होता. त्याचा पत्ता कलानगरमध्ये आहे.

 

नितेश राणे यांनी दंगलीचा सूत्रधार उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) असल्याचे म्हटले आहे. उद्धव ठाकरे यांचे निवासस्थान मातोश्री हे कलानगर येथे असून दोन दिवसांपूर्वी महाविकास आघाडीची (Mahavikas Aghadi) बैठक शरद पवार यांच्या सिल्व्हर ओकवर झाली होती. या बैठकीला उद्धव ठाकरे गेले होते. तिथे ते अजित पवारांच्या समोर बसले होते.

 

Join Our SarkarsattaWhatsapp GroupTelegram GroupFacebook Page for every Update

आमदार नितेश राणे म्हणाले, मी वारंवार सागत आहे, दंगली घडवून स्वत: मुख्यमंत्री बनण्याची इच्छा ज्या सुप्त डोक्यात आलेली.
ती इच्छा आणि ते स्वप्न आजही मेलेली नाही. उद्धव ठाकरे यांची नार्को टेस्ट करा हे मी सातत्याने सांगत आलोय.
1993 च्या दंगलीनंतर 1995 ला राज्यात शिवसेना-भाजप युतीचे (Shiv Sena-BJP Alliance) सरकार आले
असं सांगणारे ठाकरे 2004 ला परत तोच प्रयत्न करत होते, असा आरोप राणे यांनी केला.

Web Title :  Maharashtra Politics News | nitesh rane says uddhav thackeray is behind maharashtra riots

 

Trimbakeshwar Temple Case | त्र्यंबकेश्वर मंदिरात घडलेल्या ‘त्या’ प्रकाराबाबत फडणवीसांचा मोठा निर्णय, तर पोलीस म्हणतात…

Related Posts