IMPIMP

Pune Crime News | ‘येथे फक्त आमचीच दहशत, आम्ही इथले भाई’ येरवडा परिसरात कोयता गँगची दहशत, तरुणावर कोयत्याने वार

by sachinsitapure
Pune Crime News | 'Only our terror here, we are brothers here' terror of Koyta Gang in Yerwada area, youth stabbed with Koyta

पुणे : सरकारसत्ता ऑनलाईन – Pune Crime News | पुण्यात कोयता गँग (Pune Koyta Gang) विरोधात पोलिसांनी कारवाईचा बडगा उगारला आहे. मात्र, कोयता गँगची दहशत कमी होताना दिसत नाही. येरवडा परिसरात एका तरुणावर कोयत्याने वार करुन परिसरात दहशत निर्माण केल्याची घटना घडली आहे. (Pune Crime News) टोळक्याने पुर्वीच्या भांडणाचा राग मनात धरुन तरुणावर कोयत्याने वार केले. याप्रकरणी चार जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Join Our SarkarsattaWhatsapp GroupTelegram GroupFacebook Page for every Update

जय भडकुंभे (वय-22), ऋषभ भडकुंभे (वय-23), मंगल भडकुंभे (वय-40 रा. कंजारभाट, येरवडा, पुणे), रोहन मोहीते (वय-21) असे गुन्हा दाखल केलेल्या आरोपींची नावे आहेत. तर जखमी अभिजीत किरण कुलकर्णी (वय-21 रा. यशवंतनगर, येरवडा) यांनी येरवडा पोलीस ठाण्यात (Yerawada Police Station) फिर्याद दिली आहे. त्यानुसार पोलिसांनी चार जणांवर आयपीसी 324, 323, 504, 506, 34, आर्म अॅक्ट (Arm Act), महाराष्ट्र पोलीस अॅक्ट (Maharashtra Police Act), क्रिमिनल लॉ अमेंडमेंट अॅक्ट (Criminal Law Amendment Act) नुसार गुन्हा (FIR) दाखल केला आहे. हा प्रकार शनिवारी (दि.19) रात्री साडे आठच्या सुमारास नवी खडकी येथील जिजामातानगर येथे घडला. (Pune Crime News)

 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी आणि कुलकर्णी यांच्यात किरकोळ कारणावरून वाद झाला होता.
कुलकर्णी येरवड्यातील नवी खडकी भागातून निघाला होता. त्यावेळी आरोपींनी त्याला गाठले.
जय भडकुंभे याने फिर्यादी यांना शिवीगाळ (Abuse) करुन त्याच्या हातातील फायटरेने डोक्यात मारुन जखमी केले.
तर ऋषभ भडकुंभे याने त्याच्या हातातील कोयत्याने फिर्यादी यांच्या डोक्यात दोन जागी मारुन गंभीर जखमी केले.

आरोपींनी हातातील कोयते हवेत फिरवून ‘येथे फक्त आमचीच दहशत चालणार कोणी दुसरा येथे आला तर त्याला
जिवंत सोडणार नाही, आम्ही इथले भाई आहोत’, असे म्हणून जोरजोरात आरडा ओरडा करुन परिसरात दहशत निर्माण केली.
घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक शेलार (PSI Shelar)
करीत आहेत.

 

Related Posts