IMPIMP

Pune Crime News | पुणे क्राईम न्यूज : हवेली पोलिस स्टेशन – खडकवासला धरण परिसरात गोळीबार ! मित्रांवर इम्प्रेशन पाडण्यासाठी केलं कृत्य, तिघांविरूध्द गुन्हा

by nagesh
Pune Crime News | Pune Crime News: Haveli Police Station - Khadakwasla Dam area firing! Act done to impress friends, crime against three

पुणे : सरकारसत्ता ऑनलाईन – Pune Crime News | मित्रांवर केवळ इम्प्रेशन पाडण्यासाठी परवानाधारक पिस्तुलातून गोळीबार (Firing In
Pune) केल्याची घटना खडकवासला धरणाच्या (Khadakwasla Dam) परिसरात घडली. याप्रकरणी हवेली पोलिसांनी (Haveli Police) तिघांविरूध्द
गुन्हा दाखल केला आहे. (Pune Crime News)

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

तेजस प्रकाश गोंधळे Tejas Prakash Gondhale (29, रा. तेजदीप निवास, संकल्प सोसायटी, गोंधळेनगर, हडपसर), अजिंक्य भानुदास मोडक Ajinkya Bhanudas Modak (34, रा. गट नं. 11, हॉटेल अभिरूची समोर, फुरसुंगी) आणि चेतन मच्छिंद्र मोरे Chetan Machindra More (24, रा. लेन नं. 10, तुकाई दर्शन) अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत. (Pune Crime News)

 

याबाबत अधिक माहिती अशी की, तेजस गोंधळे, अजिंक्य मोडक आणि चेतन मोरे हे तिघे सिंहगड परिसरात फिरण्यासाठी गेले होते. तिघांनी पुणे-पानशेत रस्त्याला लागून असलेल्या मणेरवाडी (ता. हवेली) गावच्या हद्दीतील एका हॉटेलमध्ये जेवण केले. त्यानंतर तिघे चालक खडकवासला धरणाच्या पाण्याजवळ गेले. मित्रांवर इम्प्रेशन पाडण्यासाठी तेजसने त्याच्याकडे असलेल्या पिस्तुलातून गोळीबार केला.

 

दोन वेळा फायरिंग झाल्याचा आवाज आल्याने हॉटेलमधील वेटरने त्याच्या मालकाला सांगितले. हॉटेल मालकाने तात्काळ याबाबत हवेली पोलिस स्टेशनमध्ये घटनेची माहिती दिली. पोलिसांनी तातडीने घटनास्थळ गाठले. पोलिस येईपर्यंत तेजस, अजिंक्य आणि चेतन हे  गाडीतून निघून गेले होते. मात्र, हॉटेल मालकाने त्यांच्या वाहनाचा नंबर टिपला होता. (Khadakwasla Crime News)

 

वाहनाच्या नंबरवरून पोलिसांनी तिघांना ताब्यात घेतले. त्यांच्याकडे चौकशी केली. तेजसकडील पिस्तुलामधून फायरिंग झाल्याचे समोर आले. त्याच्याकडे पिस्तुलाचा परवाना आहे. दरम्यान, वेटरने दिलेल्या फिर्यादीवरून तिघांविरूध्द हवेली पोलिस स्टेशनमध्ये (Haveli Police Station) गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी गोळीबार करून परिसरात भितीचे वातावरण निर्माण केल्याप्रकरणी
पिस्तुल जप्त केले आणि तिघांना नोटीस देवुन सोडून देण्यात आले. हवेली पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक सचिन वांगडे (Police Inspector Sachin Wangde) यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरीक्षक ऋतुजा मोहिते (PSI Rituja Mohite) अधिक तपास करीत आहेत.

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

Web Title :- Pune Crime News | Pune Crime News: Haveli Police Station – Khadakwasla Dam area firing! Act done to impress friends, crime against three

 

हे देखील वाचा :

MP Supriya Sule | सुप्रिया सुळेचा मोठा दावा, म्हणाल्या – ’15 दिवसांत दिल्ली आणि राज्यात दोन राजकीय भूकंप होणार’

Ajit Pawar | अजित पवारांनी ट्विटर आणि Facebook वरुन हटवलं राष्ट्रवादीचे चिन्ह

Pune Crime News | पुणे क्राईम न्यूज : लोणी काळभोर पोलीस स्टेशन – आई मारते म्हणून तीन लहान मुले घरातून गेली निघून; चार तासांच्या प्रयत्नानंतर कॅम्पात सापडली सुखरुप

NCP Chief Sharad Pawar | अजित पवार भाजपसोबत जाणार? शरद पवारांनी स्पष्टच सांगितलं; म्हणाले- ‘ही चर्चा…’

 

Related Posts