IMPIMP

Pune Crime News | पुणे क्राईम न्यूज : खडक पोलिस स्टेशन – घरगुती भांडणातून सूनेसह पाच जणांवर दरोड्याचा गुन्हा दाखल

by nagesh
Pune Crime News | Pune Crime News: Khadak Police Station - A case of robbery has been registered against five persons including daughter-in-law due to a domestic dispute

पुणे : सरकारसत्ता ऑनलाईन- Pune Crime News | घरगुती भांडणांमध्ये झालेल्या वादात सून व तिच्या नातेवाईकांनी घरात शिरुन सासूला मारहाण (Beating) करुन दागिने चोरुन नेले. बेकरीतील सामानाचे व वस्तुंची तोडफोड केल्याने पोलिसांनी सर्वांवर दरोड्याचा गुन्हा दाखल केला आहे. (Pune Crime News)

 

याप्रकरणी सलमा अक्रम अन्सारी (वय ५६, रा. घोरपडी पेठ) यांनी खडक पोलीस स्टेशनमध्ये (Khadak Police Station) फिर्याद (गु. रजि. नं. १२६/२३) दिली आहे. त्यानुसार पोलिसांनी फिर्यादी यांची सून फराना अन्सारी, तिची आई आबिदा अन्सारी, तिचे वडिल मोहम्मद अली अन्सारी, भाऊ फेज अन्सारी व कैफ अन्सारी आणि इतर पाच जणांविरुद्ध गुन्हा (FIR) दाखल केला आहे. ही घटना घोरपडी पेठेतील रोलॅक्स बेकरीवरील (Rolex Bakery, Ghorpadi Peth) घरात २२ एप्रिल रोजी रात्री ११ वाजता घडला. (Pune Crime News)

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी आणि आरोपी फराना या सासू, सुना आहेत. त्यांच्यात घरगुती भांडणे आहेत. त्यांची सून फराना अन्सारी ही आपल्या आईवडिल व इतरांना घेऊन फिर्यादीच्या घरी आली. त्यांनी फिर्यादी यांना हाताने मारहाण केली. कैफ याने फिर्यादीच्या गळ्यातील ९० हजार रुपयांची १८ ग्रॅम वजनाची सोन्याची चैन खेचून घेतली. कपाटातील ७० हजार रुपये रोख व १२ ग्रॅम वजनाचे ६० हजार रुपयांचे सोन्याचे दागिने जबरदस्तीने घेऊन गेले. त्यांच्याबरोबर असलेल्या पाच जणांनी फिर्यादीच्या मालकीच्या रोलॅक्स बेकरीतील सामानाचे व वस्तुंची तोडफोड करुन नुकसान केले. सहायक पोलीस निरीक्षक जाधव तपास करीत आहेत.

 

 

Web Title :-   Pune Crime News | Pune Crime News: Khadak Police Station – A case of robbery has been registered against five persons including daughter-in-law due to a domestic dispute

 

हे देखील वाचा :

Pune Crime News | पुणे क्राईम न्यूज : कोंढवा पोलिस स्टेशन – चाकू दाखवून केला घाबरविण्याचा प्रयत्न; तोच चाकू खुपसून केला खून

Pune PMC News | नदीकाठ सुधार योजनेत केवळ १ हजार ७३४ बाभळी, सुबाभळीची झाडे काढण्यात येणार
Pune PMC water Supply | गुरुवारी संपूर्ण पुणे शहराचा पाणीपुरववठा बंद राहणार

 

Related Posts