IMPIMP

Pune Crime News | गडचिरोली, भंडारा जिल्ह्यातून गांजा विक्री करिता पुण्यात आलेल्या 3 उच्चशिक्षित तरूणांना गुन्हे शाखेच्या अंमली पदार्थ विरोधी पथक-2 कडून अटक; 12 लाखाचा माल जप्त

by nagesh
Pune Crime News | Pune Police Crime Branch Anti Narcotics Cell Arrest youths from Gadchiroli, Bhandara for selling ganja

पुणे : सरकारसत्ता ऑनलाईन – Pune Crime News | गडचिरोली (Gadchiroli), भंडारा जिल्ह्यातून (Bhandara) पुण्यात गांजा विक्री (Ganja) करण्याकरिता आलेल्या 3 उच्चशिक्षीत तरूणांना पुणे शहर पोलिसांच्या (Pune City Police) गुन्हे शाखेच्या (Pune Police Crime Branch) अंमली पदार्थ विरेाधी पथक-2 ने (Anti Narcotics Cell Pune (ANC Pune) अटक केली आहे. त्यांच्याकडून 11 लाख 70 हजार 500 रूपये किंमतीचा ऐवज जप्त करण्यात आला आहे. (Pune Crime News)

राम राजेश बैस Ram Rajesh Bais (20, रा. रामपुरी वार्ड, कॅम्प परिसर, गडचिरोली), ऋतिक कैलास टेंभुर्णे Hrithik Kailas Tembhurne (21, रा. मु.पो. गौराळा, ता. लाखुंदर, जि. भंडारा) आणि निकेश पितांबर अनोले Nikesh Pitambar Anole (22, रा. कस्तुरबा वार्ड, तालुका देसाईगंज, जि. गडचिरोली) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. याबाबत अधिक माहिती अशी की, रविवारी (दि. 18 जून 2023) रोजी अंमली पदार्थ विरोधी पथक-2 चे पोलिस अधिकारी (Pune Cop) व पोलिस अंमलदार हे चंदननगर पोलिस स्टेशनच्या (Chandannagar Police Station) हद्दीत पेट्रोलिंग करीत होते. त्यावेळी पोलिस हवालदार चेतन गायकवाड आणि पोलिस हवालदार रविंद्र रोकडे यांना खराडी बायपास (Kharadi Bypass) येथील सार्वजनिक फुटपाथ येथे तिघेजण गांजाची विक्री करण्याकरिता येणार असल्याची माहिती मिळाली. (Pune Crime News)

सदरील माहिती वरिष्ठांना कळविल्यानंतर त्यांनी कायदेशीर कारवाई करण्याबाबतच्या सुचना दिल्या. पोलिसांनी सापळा रचुन तिघांना ताब्यात घेतले. त्यांच्याकडील 11 लाख 14 हजार रूपये किंमतीचा 55 किलो 700 ग्रॅम वजनाचा गांजा हा अंमली पदार्थ तसेच 50 हजाराचे 3 मोबाईल आणि रोख रक्कम असा एकुण 11 लाख 70 हजार 500 रूपयाचा ऐवज जप्त करण्यात आला. पोलिसांनी त्यांच्याविरूध्द चंदननगर पोलिस स्टेशनमध्ये एनडीपीएस अ‍ॅक्टनुसार (NDPS Act) गुन्हा दाखल केला आहे.

Join Our SarkarsattaWhatsapp GroupTelegram GroupFacebook Page for every Update

सदरची कामगिरी पोलिस आयुक्त रितेश कुमार (IPS Ritesh Kumar),
सह पोलिस आयुक्त संदिप कर्णिक (IPS Sandeep Karnik),
अप्पर पोलिस आयुक्त रामनाथ पोकळे (IPS Ramnath Pokale),
पोलिस उपायुक्त अमोल झेंडे (DCP Amol Zende), सहाय्यक पोलिस आयुक्त सतीश गोवेकर
(ACP Satish Govekar) यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक सुनील थोपटे
(PI Sunil Thopte), सहाय्यक फौजदार घुले, पोलिस हवालदार चेतन गायकवाड,
संतोष देशपांडे, संदीप जाधव, रविंद्र रोकडे, महेश साळुंखे, साहिलसय्यद शेख, नितीन जगदाळे,
अझीम शेख आणि दिनेश बास्टेवाड यांच्या पथकाने केली आहे.

Web Title : Pune Crime News | Pune Police Crime Branch Anti Narcotics Cell Arrest youths from Gadchiroli,
Bhandara for selling ganja

Related Posts