IMPIMP

Maratha Reservation | मराठा आरक्षण आंदोलन : नवले पुलावरील जाळपोळप्रकरणी पुणे पोलिसांची मोठी कारवाई, 400 ते 500 जणांवर गुन्हा दाखल

by sachinsitapure
Maratha Reservation

पुणे : सरकारसत्ता ऑनलाईन – Maratha Reservation | पुणे-बंगळुरू राष्ट्रीय महामार्गावर (Pune-Bangalore National Highway) नवले पुलाजवळ (Navale Bridge) केलेल्या जाळपोळ प्रकरणी पुणे पोलिसांनी (Pune Police) मोठी कारवाई केली आहे. पोलिसांनी 400 ते 500 जणांवर गुन्हा दाखल केला आहे. सार्वजनिक मालमत्तेचे नुकासन करुन गर्दी जमा केल्याप्रकरणी सिंहगड रोड पोलीस ठाण्यात (Sinhagad Road Police Station) गुन्हा दाखल केला आहे. नवले पुलावर मोठ्या संख्येने मराठा आरक्षणासाठी (Maratha Reservation) आंदोलक जमले होते. त्यामुळे महामार्गावर दोन्ही बाजूला वाहनांच्या मोठ्या प्रमाणावर रांगा लागल्या होत्या.

Join Our SarkarsattaWhatsapp GroupTelegram GroupFacebook Page for every Update

रवी पडवळ, प्रशांत पवार, निखिल पानसरे, उमेश महाडिक, संतोष साठे, निखिल धुमाळ, समीर घाटे, अभिषेक भरम, विराज सोले, योगेश दसवडकर यांच्या सह इतर 400 ते 500 कार्यकर्त्यांवर आयपीसी 143 ,147 ,188, 341, 336, महाराष्ट्र पोलीस कायदा 1951 चे कलम 37(1)(3) 135 सह क्रिमिनल अमेंडमेंट लॉ अॅक्ट 07 नुसार गुन्हा दाखल केला आहे. याबाबत पोलीस हवालदार नितीन निवृत्ती खुटवड यांनी सिंहगड रोड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

https://www.instagram.com/reel/CzF8xOBpr8z/?utm_source=ig_web_copy_link&igshid=MzRlODBiNWFlZA==
पुण्यातील नवले पुलावर मराठा समाजाचे कार्य़कर्ते आक्रमक झाले होते. अनेक मराठा कार्य़कर्ते रस्त्यावर उतले होते. नवले पुलावर टायरची जाळपोळ करण्यात आली होती. रस्त्याच्या मधोमध टायर जाळल्याने नवले पुलाजवळ गोंधळाचं वातावरण निर्माण झालं होते त्यामुळे अनेक नागरिकांना नाहक त्रास सहन करावा लागला. पुण्यातील नवले पुलावर काल दुपारी मराठा समाजाला आरक्षण मिळावे यासाठी काही तरुणांनी नवले पुलावर आंदोलन केले होते. या आंदोलनावेळी मुंबई-बेंगलोर महामार्गावर टायर जाळण्यात आली होती. सिंहगड रोड पोलीस ठाण्यात या आंदोलकांवर गुन्हा दाखल केला आहे. (Maratha Reservation)

काय म्हटले फिर्यादीत?

मराठा आंदोलकांनी काल दुपारी 12: 15 ते 02:45 दरम्यान राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 48 मुंबई बेंगलोर वर मुंबई कडून
सातारा कडे जाणारी लेन टूर्स अँड ट्रॅव्हल्स ऑफिस समोर व साताऱ्याकडून मुंबईकडे जाणाऱ्या लेन महामार्गावर विश्वास
हॉटेलच्या समोर वडगाव बुद्रुक पुणे येथे आंदोलन केले. मराठा आरक्षण व जरांगे पाटील (Manoj Jarange Patil)
यांच्या उपोषणाला पाठिंबा देण्यासाठी मराठा क्रांती मोर्चा (Maratha Kranti Morcha) व सखल मराठा मोर्चा
(Sakhal Maratha Morcha) कार्यकर्ते यांनी आदोलन केले. गुन्हा दाखल केलेल्या आंदोलकांनी
पुणे शहर आयुक्तालय क्षेत्रात लागू असलेल्या मनाई आदेशाचे उल्लंघन करुन बेकायदेशीर जमाव जमवून
राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 48 हा दोन्ही तर्फा रस्त्यावर टायर ट्यूब ,टायर्स ट्यूब, प्लास्टिक कँड पेटवले.
यामुळे इतरांच्या जीवितस धोका होईल याची जाणीव असताना सुद्धा पेटवून देत आक्रमक होऊन घोषणा देऊन
वाहतूक बंद केली. तसेच प्रवासी गाड्यातील प्रवासी व आजूबाजूच्या परिसरातील दुकानांमध्ये दहशत निर्माण केली.
पुढील तपास सहायक पोलीस निरीक्षक प्रविण जाधव (API Pravin Jadhav) करीत आहेत.

Related Posts