IMPIMP

Pune Crime News | रजनीश भंडारी, अनुज भंडारी व त्यांच्या बी. यु. भंडारी एम अँड एम रिअल्टर्स एलएलपी कंपनी विरोधात फसवणूकीचा गुन्हा

by sachinsitapure
Cheating

पुणे : सरकारसत्ता ऑनलाईन – Pune Crime News| खराडी येथील नियोजित इमारतीमधील पाचव्या मजल्यावरील चार ऑफिसेस आणि चार कव्हर्ड पार्किंग देण्याबाबत समजुतीचा करारनामा (एम.ओ.यु) करुन देखील जागा ताब्यात न देता फसवणूक (Cheating Fraud Case) केली. याप्रकरणी बी. यू. भंडारी एम अँड एम रियल्टर्स एलएलपी कंपनी (B. U. Bhandari M&M Realtors LLP Company) विरोधात सिंहगड रोड पोलीस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तसेच बुकिंगसाठी दिलेली रक्कम व्याजासह परत न करता 2 कोटी 16 लाखांची फसवणूक केल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. हा प्रकार 31 ऑक्टोबर 2020 रोजी वडगाव बुद्रुक येथे तक्रारदार यांच्या कार्यालयात घडला आहे. (Pune Crime News)

याबाबत नरेश रामचंद्र मित्तल Naresh Ramachandra Mittal (वय-59 रा. विजयनगर कॉलनी, सदाशिव पेठ, पुणे) यांनी मंगळवारी (दि.28) सिंहगड रोड पोलीस ठाण्यात (Sinhagad Road Police Station) फिर्याद दिली आहे. यावरुन रजनीश माणिकलाल भंडारी (Rajnish Maniklal Bhandari), अनुज माणिकलाल भंडारी Anuj Maniklal Bhandari (दोघे रा. 264, सिंग सोसायटी, औंध, पुणे) व त्याची फर्म बी. यु. भंडारी एम अँड एम रियल्टर्स एलएलपी कंपनी विरोधात आयपीसी 406, 420, 34 नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. (Pune Crime News)

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, बी. यु. भंडारी एम अँड एम रियल्टर्स एलएलपी कंपनी मार्फत खराडी येथील सर्व्हे
क्रमांक 39/2, 39/2 (नवीन सर्व्हे क्रमांक 39/3) येथे नियोजित इमारत करण्यात आली होती.
या इमारतीच्या पाचव्या मजल्यावरील ऑफिस क्रमांक 3, 5, 6 व 7 अशी 2 हजार 511 चौरस फुटांची मिळत तसेच
चार कव्हर्ड पार्किंग देण्याबाबत नरेश मित्तल यांच्या वडगाव बुद्रुक येथील कार्यालयात समजुतीचा करारनामा
(MOU) करण्यात आला होता.

Join Our SarkarsattaWhatsapp GroupTelegram GroupFacebook Page for every Update

करारनामा केल्यानंतर मित्तल यांनी 1 कोटी 4 लाख 5 हजार रुपये दिले. मात्र, त्यांना ऑफिसचा ताबा दिला नाही.
तसेच समजुतीचा कररानामा करताना ठरलेली रक्कम व्याजासहित परत न करता या रक्कमेचा अपहार करुन
2 कोटी 16 लाख 50 हजार रुपयांची आर्थिक फसवणूक केल्याचे मित्तल यांनी फिर्यादीत नमूद केले आहे.
पुढील तपास वरिष्ठ पोलीस निरीक्षक अभय महाजन (Senior PI Abhay Mahajan) करीत आहेत.

Related Posts