IMPIMP

Pune Crime News | चोरट्यांनाही YAMAHA Rx 100 ची भुरळ ! पुण्यात चोरट्यांकडून 17 दुचाकी जप्त, तिघांना अटक

by nagesh
Pune Crime News | Vishrambaug Police Arrest Aditya Dattatray Mankar And Mayur Alias Bhaiya Pandurang Pawar In YAMAHA Rx 100 Vehicle Theft

पुणे : सरकारसत्ता ऑनलाईन – Pune Crime News | चोरट्यांमध्ये देखील YAMAHA Rx 100 ची क्रेझ पहावयास मिळाली आहे. दोघा चोरट्यांनी चोरलेल्या 17 यामाहा आरएक्स 100 विश्रामबाग पोलिसांनी (Vishrambaug Police Station) अटक केल्या आहेत (Vehicle Theft). त्यांच्याकडून साडेचार लाख रूपये किंमतीच्या 17 दुचाकी जप्त करण्यात आल्या आहेत. (Pune Crime News)

शहरातील विविध परिसरातून यामाहा आरएक्स 100 दुचाकींची चोरी करून ती वाहने ग्रामीण भागात विकणार्‍यांच्या मुसक्या विश्रामबाग पोलिसांनी आवळल्या आहेत. आदित्य दत्तात्रय मानकर Aditya Dattatray Mankar (19, रा. दातार कॉलनी, उरळी कांचन – Datar Colony Uruli Kanchan,) आणि मयूर उर्फ भैय्या पांडुरंग पवार Mayur Alias Bhaiya Pandurang Pawar (20, रा. बवरापूर रोड, तांबे वस्ती, उरळी कांचन) यांच्यासह त्यांच्याकडून दुचाकींची खरेदी करणार्‍याला देखील पोलिसांनी केली आहे. (Pune Crime News)

आरोपींकडून विश्रामबागसह खडक पोलिस स्टेशन (Khadak Police Station), लष्कर पोलिस स्टेशन (Lashkar Police Station), फरासखाना पोलिस स्टेशन (Faraskhana Police Station) आणि अलंकार पोलिस स्टेशनमधील (Alankar Police Station) वाहन चोरीचे गुन्हे उघडकीस आले आहेत. पोलिस आयुक्त रितेश कुमार (IPS Ritesh Kumar), सह पोलिस आयुक्त संदिप कर्णिक (IPS Sandeep Karnik), अप्पर पोलिस आयुक्त प्रविणकुमार पाटील (IPS Pravinkumar Patil), पोलिस उपायुक्त संदीपसिंह गिल्ल (IPS Sandeep Singh Gill), सहाय्यक पोलिस आयुक्त वसंत कुवर (ACP Vasant Kunwar) यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलिस निरीक्षक सुनिल माने (Sr PI Sunil Mane), पोलिस निरीक्षक (गुन्हे) दादा गायकवाड (PI Dada Gaikwad), पोलिस उपनिरीक्षक राकेश सरडे (PSI Rakesh Sarde), पोलिस हवालदार हर्षल दुडम, पोलिस अंमलदार मयुर भोसले, प्रकाश बोरूटे, महावीर वलटे, सागर गोंजारी, आशिष खरात आणि सत्ताप्पा पाटील यांच्या पथकाने केली आहे.

आरोपींकडून आणखी काही गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता आहेत. चोरटे दिवसभर रेकी करून
रात्रीच्या वेळी पार्किंगमध्ये किंवा रस्त्याच्या कडेला उभ्या केलेल्या
दुचाकींची चोरी करीत असल्याचे पोलिसांच्या तपासात (Pune Police) निष्पन्न झाले असून
हे चोरटे केवळ यामाहा आरएक्स 100 या दुचाकीची चोरी करीत होते.

Web Title : Pune Crime News | Vishrambaug Police Arrest Aditya Dattatray Mankar And Mayur Alias
Bhaiya Pandurang Pawar In YAMAHA Rx 100 Vehicle Theft

Related Posts