IMPIMP

Pune Crime | धक्कादायक! बॅडमिंटनचे फूल काढताना वीजवाहिनीचा धक्का; मुलीचा उपचारादरम्यान दुर्दैवी मृत्यू; लोणी काळभोर परिसरातील घटना

by nagesh
Pune Crime News | Kothrud Police Station: One killed, another critically injured due to electrocution from high voltage power line

पुणे :सरकारसत्ता ऑनलाईन – Pune Crime | घराच्या गच्चीवर बॅडमिंटन खेळताना पडलेले फूल काढताना वीजवाहिनीचा धक्का बसून 10 वर्षांच्या मुलीचा मृत्यू झाला. ही दुर्दैवी घटना (Pune Crime) कदमवाकवस्ती ग्रामपंचायत हद्दीतील घोरपडे वस्तीवर घडली. भाग्यश्री धनाजी बनसोडे (वय 10) असे मृत्यू झालेल्या मुलीचे नाव आहे.

 

पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, मागील रविवारी भाग्यश्री घराच्या गच्चीवर बॅडमिंटन खेळत होती. त्यावेळी बॅडमिंटनचे फूल गच्चीच्या दुसऱ्या बाजूला पडले. ते फूल काढण्यासाठी भाग्यश्री इमारतीच्या गच्चीवर गेली होती. गच्चीवरून गेलेल्या वीजवाहक तारांच्या खाली चार फूट उंचीची भिंत असल्याने, ती शिडीच्या साह्याने वर चढली.

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

बॅडमिंटनचे फूल काढत असताना वीजवाहक तारांच्या संपर्कात आल्याने भाग्यश्री 50 टक्के भाजली.
तिला तातडीने रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. मागील सात दिवसांपासून तिच्यावर उपचार सुरू होते.
अखेर तिचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. भाग्यश्रीचा मृत्यू झाल्याचे समजताच परिसरात शोककळा पसरली आहे.
लोणी काळभोर पोलीस ठाण्यात या घटनेची नोंद करण्यात आली असून पोलीस तपास करीत आहेत.

 

Web Title :- Pune Crime | school girl dies of electric shock while picking badminton flower pune crime news

 

हे देखील वाचा :

Mahaparinirvan Din – Gaurav More | महाराष्ट्राची हास्यजत्रा फेम गौरव मोरेची महापरिनिर्वाणदिनी खास पोस्ट

Ajit Pawar | ‘इंदू मिल येथील स्मारक लवकर पूर्ण व्हावे, कोणीही राजकारण करू नये’ – अजित पवार

Nashik ACB Trap | 51 हजारांची लाच स्वीकारताना ठेकेदार पोलिसांच्या जाळ्यात; नाशिकमधील प्रकार

 

Related Posts