Pune Kasba Peth Bypoll Election | ‘माझ्या आईचा जनसंपर्क कमी झाला नव्हता, त्यामुळे…’, चंद्रकांत पाटलांवर कुणाल टिळकांचा पलटवार

पुणे : सरकारसत्ता ऑनलाईन – भाजपचे (BJP) नेते आणि पुण्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) यांनी सोमवारी एका कार्यक्रमात बोलताना कसबा पोटनिवडणुकीत (Pune Kasba Peth Bypoll Election) टिळक कुटुंबीयांना उमेदवारी न देण्याबाबतचा खुलासा केला होता. मुक्ता टिळक (Mukta Tilak) यांच्या आजारपणामुळे दोन वर्षांच्या काळात कसब्यातील मतदारांशी संपर्क तुटला होता. तर पती शैलेश आणि मुलगा कुणाल यांना मुक्ताताईंच्या सेवेसाठी बराच वेळ द्यावा लागत होता. त्यामुळे त्यांचाही कसब्यातील राजकीय आणि सामाजिक एक्जिस्टन्सही कमी झाला होता. याच कारणामुळे कसबा पोटनिवडणुकीत (Pune Kasba Peth Bypoll Election) भाजपने टिळक कुटुंबाबाहेर उमेदवारी दिल्याचे चंद्रकांत पाटील म्हणाले होते. यावर मुक्ता टिळक यांचे चिरंजीव कुणाल टिळक (Kunal Tilak) यांनी चंद्रकांत पाटलांवर पलटवार केला आहे.
Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update
कुणाल टिळक म्हणाले, माझ्या आईने कसबा पेठ मतदारसंघात 20 ते 25 वर्ष काम केले होते. या काळात तिने निर्माण केलेला जनसंपर्क (Public Relations) आजारपणाच्या दोन वर्षांच्या काळात पूर्णपणे संपला, असे बोलणे योग्य ठरणार नाही. माझ्या आईने भाजप पक्षासाठी कसब्यात केलेल्या कार्याचा आदर व्हायला हवा, अशा शब्दांत कुणाल टिळक यांनी चंद्रकांत पाटील यांना प्रत्युत्तर दिले आहे.
मुक्ता टिळक यांच्या कार्याचा आदर झाला पाहिजे
कुणाल टिळक पुढे म्हणाले, मी एवढंच सांगेन की, माझ्या आईने गेली 20-25 वर्ष कसब्यात काम केले.
या काळात तिने निर्माण केलेला जनसंपर्क दोन वर्षांच्या आजारपणाच्या काळात कमी झाला नव्हता.
त्यामुळे कसब्यात सहानुभूतीची एक लाट होती. कसबा पोटनिवडणुकीत (Pune Kasba Peth Bypoll Election)
भाजप पक्ष मैदानात उतरला तेव्हा वेगळ्याप्रकारे झालेले मतदान दिसून आले. 20-25 वर्षांचा जनसंपर्क दोन वर्षांमध्ये कमी होत नसतो. माझी आई आजारी असतानाही क्रार्यक्रमांना जात होती. तिने कसबा मतदारसंघासाठी निधी आणला होता. विकास कामे सुरु होती. गिरीश बापट (Girish Bapat) यांच्यानंतर माझ्या आईने कसबा मतदारसंघ बांधून ठेवला होता. त्यामुळे मुक्ता टिळक यांच्या कार्याचा आदर झाला पाहिजे. माझ्या आईच्या कार्याकडे दुर्लक्ष करणं बरोबर नसल्याचे कुणाल यांनी सांगितले.
Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update
कसब्यातून लढवण्यास इच्छुक
कुणाल टिळक यांनी आगामी विधानसभा निवडणूक (Assembly Elections-2024) कसब्यातून लढवण्यास
इच्छुक असल्याचे सांगितले. कसबा पोटनिवडणुकीतही अनेक लोकांचा सेल्फ इंटरेस्ट नसताना कोथरुड, खडकवासला,
शिवाजीनगर परिसरातील लोक कसब्यात ठाण मांडून होते. पुढील निवडणुकीत कसब्यात बदल दिसेल,
याची शंभर टक्के खात्री असल्याचे कुणाल टिळक यांनी सांगितले.
Web Title :- Pune Kasba Peth Bypoll Election | mukta tilak son kunal tilak hits back over bjp chandrakant patil statement saying tilak family existence finishes in kasba peth
Six Red Snooker Tournament | सिक्स रेड स्नुकर स्पर्धेत पिनाक बॅनर्जी, आशिष थोरात यांना विजेतेपद !!
Comments are closed.