IMPIMP

Pune : महामेट्रोचा मोठा निर्णय ! आता पुणेकरांना मेट्रोतून सायकलसह प्रवास करता येणार

by bali123
pune mahametro announced people can carry bicycle while travelling by metro hemant sonawane

पुणे : सरकारसत्ता ऑनलाइन – देशातील वाढत्या इंधन दराच्या पार्श्वभूमीवर सायकल प्रवासाला चालना देण्यासाठी महामेट्रोने maha metro  एक महत्वपूर्ण निर्णय घेतला आहे. आता सायकलप्रेमींना मेट्रोतून सायकल घेऊन प्रवास करण्याची परवानगी दिली जाणार आहे. तसेच या सायकलचे कोणतेही वाढीव शुल्क आकारले जाणार नाहीत. शहरातील सर्व वयोगटांतील लोकांना आपली सायकल घेऊन मेट्रोने maha metro प्रवास करता येणार असल्याची माहिती महामेट्रोचे महाव्यवस्थापक हेमंत सोनवणे यांनी दिली आहे. यामुळे येणाऱ्या काळात पुणेकरांच्या खिशावरील ताणही कमी होणार आहे.

सोनवणे म्हणाले की, नागपूरमध्ये सध्या सायकलप्रेमींसह विद्यार्थ्यांना सायकलसह मेट्रोतून प्रवास करण्यास परवानगी दिली आहे. याच धर्तीवर पुणे शहरातील विद्यार्थी, नोकरदार, महिला अशा सर्वच वयोगटातील व्यक्तींना आणि सायकलप्रेमींना मेट्रोतून सायकल घेवून प्रवास करण्याची परवानगी देण्यात येणार आहे. याकरिता कोणतेही वाढीव शुल्क आकारले जाणार नाही. पुण्यात विविध शैक्षणिक संस्था, आयटी कंपन्या आणि इतर व्यवसायाचे मोठ जाळ आहे. पुण्यात शिक्षण घेणारे विद्यार्थी आणि आयटी कर्मचाऱ्यांची संख्या लाखांच्या घरात आहे. त्यामुळे या वयोगटातील लोकांच्या सायकल चालवण्याच्या चळवळीला प्रोत्साहन देण्यासाठी हा निर्णय घेतल्याचे सोनवणे म्हणाले. यामुळे शहरातील वाढतं प्रदूषण कमी व्हायला मदत होणार असल्याचे ते म्हणाले.

मनसुख हिरेन प्रकरणावरून देवेंद्र फडणवीस प्रचंड संतापले, म्हणाले – ‘राज्य सरकारला लाज वाटली पाहिजे’

मृण्मयी देशपांडेच्या ‘नो मेकअप’ लुकची सोशलवर जोरदार ‘चर्चा’ !

NCB मोठी कारवाई ! सुशांतसिंह राजपूत प्रकरणी नवी माहिती समोर; ड्रग्ज देणारा सापडला

ठाकरे सरकारचे कोकणासाठी पुतना मावशीचे प्रेम ?

Related Posts